राहुरी / बाळकृष्ण भोसले - लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या तालुक्यातील सात्रळ येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात हिंदी विभागांतर्गत गुणवत्ता कक्ष आणि महाराष्ट्र हिंदी परिषद कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनातून दि. ३० व ३१ मार्च २०२२ रोजी हिंदी साहित्य विमर्श के विविध आयाम या विषयावर दोन दिवशीय ऑनलाईन आंतरराष्ट्रीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे.
या चर्चासत्रामध्ये डॉ. विनोद विश्वकर्मा ( त्रिभुवन विश्वविद्यालय काठमांडू, नेपाल), डॉ. पुस्पिता अवस्थी ( नेदरलँड ), श्रीमती शैला अग्रवाल ( कॅनडा ) तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे विभागप्रमुख प्रो. डॉ. विजयकुमार रोडे, मुंबई विद्यापीठाचे प्रो. डॉ. सचिन गपाट, दिल्ली येथील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील डॉ. मुकेशकुमार मिरोठा, डॉ. राधेशाम पणवरीया (भोपाल), प्राचार्य डॉक्टर किरण चौगले (कर्नाटक),महाराष्ट्र हिंदी परिषदेचे अध्यक्ष प्रो. डॉ. जिजाबराव पाटील, प्रधान सचिव डॉ. गजानन चव्हाण , डॉ. प्रकाश कोपारडे, परळी (बीड) इत्यादी मान्यवर या ऑनलाईन चर्चासत्रासाठी विषय तज्ज्ञ म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. अशी माहिती चर्चासत्राचे मुख्य समन्वयक, प्रभारी प्राचार्या डॉ. जयश्री सिनगर, उपप्राचार्य प्रो. डॉ. सोमनाथ घोलप, प्रा. दीपक घोलप, प्रा. दिनकर घाणे, समन्वयक व हिंदी विभागप्रमुख डॉ.भाऊसाहेब नवले, डॉ.अनंत केदारे यांनी दिली.
0 टिप्पण्या