यावेळी प्रमुख जेष्ठ सामाजिक कार्यकर्ती मंगलाताई खिवंसारा या उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी महिलांना संबोधित करतांना एकदा देशाचा कारभार आम्हां महिलाकडे देऊन तर बघा आम्ही महिला नक्कीच चांगले काम करून दाखवूत, स्पर्धेच्या युगात महिलांनी मुलींना इंग्रजी शिक्षण देण्याची नितांत गरज आहे. जर मुलींना चांगले दर्जेदार शिक्षण मिळाले तर महिलांचा विकास होऊन देशाच्या विकासात नक्कीच भर पडेल असे त्यांनी म्हटले. यावेळी जयकुमार बाकलीवाल, संजय सेठी, राजेंद्र सेठी, सुयोग बाकलीवाल, अक्षय बाकलीवाल, राजेश्री बाकलीवाल, मुख्याध्यापीका सविता वंटगिरे, कविता तांगडे, मेघा साबळे, योगिता वाघ, नंदा गाडेकर, संध्या कासार, शिवकान्या बढे, अमित लिहिणार, चैतन्य नाझरकर, सिद्धार्थ शेळके, सचिन हंगारगे, निलेश पाटील, मनोज चाबुकस्वार, शुभम घोडके, विठ्ठल महापुरे आदीसह शिक्षकवृंद उपस्थित होते.
0 टिप्पण्या