गावात दारूबंदी ठराव करूनही दारू विक्री मोठ्या प्रमाणात चालू; पोलीस अधीक्षकांना निवेदन

अहमदनगर/ जावेद शेख : नगर तालुक्यातील खांडके येथे अवैद्य दारूधंदे बंद करण्यासाठी ग्रामसभेच्या मिटिंगमध्ये 107 महिलांनी निवेदन दिले. त्या महिलांच्या मागणीनुसार दारूबंदी ठराव मासिक बैठकीत मंजूर केला असुन गावामध्ये अवैद्य दारू धंदे मोठ्या प्रमाणावर चालूच आहे. त्यामुळे हे अवैध दारूधंदे बंद करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय येथे निवेदन देण्यात आले.

यावेळी सरपंच पोपट चेमटे, जन आधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे, उपसरपंच जितेंद्र ठोंबे, ग्रामपंचायत सदस्य भगवान ठोंबे, जायदा देशमुख, जयश्री चेमटे, लैला देशमुख, रेश्मा देशमुख, भारती चेमटे, अलका चेमटे, शकीला शेख, सानिया देशमुख, राजू शेख, समीर देशमुख, रियाज शेख, अलीम देशमुख, फिरोज देशमुख, संदीप ठोंबे, विजय मिसाळ आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या