प्रहार संघटनेच्या वतीने जागतिक महिला दिनी रेल्वे पास शिबिर संपन्न

अहमदनगर/ जावेद शेख : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शहरातील दिव्यांग बंधू व भगिनींसाठी ग्रामीण रुग्णालय राहुरी येथे राहुरी तालुका प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने रेल्वे पास सवलत मिळण्यासाठी शिबिर आयोजित केले होते.

सदर शिबिरात शहरातील दिव्यांग बंधू व भगिनींनी  सहभाग घेऊन लाभ घेतला. या शिबिरास चांगला प्रतिसाद मिळाला. सिव्हिल हॉस्पिटल अहमदनगर यांच्या मार्फत मिळालेल्या प्रमाणपत्राच्या आधारे राहुरी ग्रामीण रुग्णालयाचे डॉ वैरागर यांनी तपासणी करून रेल्वे पास मिळण्यासाठी प्रमाणपत्र देण्यात आले. रेल्वे पास मिळण्याचा अर्ज तीन प्रतित तयार करून श्रीरामपुर येथील रेल्वे स्टेशन वर जमा करण्यात आले. ते अर्ज रेल्वे शाखा प्रबंधक मार्फत सोलापूर डीव्हीजन ला पाठवले जाणार आहे. एक महिन्यात 75% रेल्वे सवलतीचा पास मिळणार आहे.

आजच्या शिबिरासाठी आयोजनापासून नियोजनापर्यंत परिश्रम घेणारे प्रहार जिल्हा समन्वयक आप्पासाहेब ढोकणे, राहुरी तालुका प्रहार दिव्यांग संघटना अध्यक्ष मधुकर घाडगे, उपाध्यक्ष विठ्ठल पांडे, तालुका सचिव योगेश लबडे, संपर्क प्रमुख रविंद्र भुजाडी, सल्लागार सलीमभाई शेख, राहुरी शहराध्यक्ष वैभव थोरात, शहर उपाध्यक्ष जालिंदर भोसले, ब्राम्हनी शाखा अध्यक्ष बाबुराव शिंदे, महिला अध्यक्षा रुपाली जाधव, उपाध्यक्षा छायाताई हारदे, अनामिका हरेल, वैशाली शिंदे, करुणा हापसे, सुनीता झांबरे, छाया साठे, सुरेखा सांगळे, संगीता धोंगडे, कविता सुर्यवंशी व प्रहार पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले. तसेच लवकरच राहुरी तालुक्यातील शाखा नुसार रेल्वे पास काढण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. तरी तालुक्यातील दिव्यांगांनी त्यांचा लाभ घ्यावा असे असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या