श्रीरामपूर [बाबासाहेब चेडे] : माजी मंत्री व शंकरराव गेणुजी कोल्हे वय ९३ यांचे आज बुधवारी पहाटे नाशिक येथील सुश्रुत रुग्णालयात वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचा अंत्यविधी बुधवारी आज सायंकाळी ४.३० वाजता सहजानंदनगर संजीवनी इंजिनीअरिंग कॉलेज येथे होणार आहे.
त्यांचे पार्थिव येसगाव वस्तीवर, नंतर दुपारी संजीवनी कारखाना कार्यस्थळावर दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. ते संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्था कोपरगाव, गडावरी खोरे सहकारी दुध संस्था, देवयानी सहकारी बँक कोपरगाव आदीचे जनक संस्थापक होते. १९७२ ते २००४ पर्यंत लोकप्रतिनिधी होते. त्यांचा जन्म येसगाव ता. कोपरगाव येथे झाला, शिक्षण बीएससी ॲग्री, वयाच्या ९३ व्या वर्षी कोरोनावर मात केली होती. ९३ व्या वाढदिवसाला आठवडा राहिला होता.
त्यांच्या आत्मचरित्राच्या तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन करावयाचे होते. कोल्हे परिवाराचे मोबाईल क्रमांक नितीनदादा कोल्हे ९८२२६२२९९९, बिपिनदादा कोल्हे ९८५००७५९९९, अमीतदादा कोल्हे ९८५०५२२७७७, विवेकदादा कोल्हे ९८५०२२३३३३, जेष्ठ नेते शंकरराव यांच्या निधनाने तालुक्याची अपरिमित हानी झाली आहे. सहकारातील तळपत्या सूर्याचा अस्त झाला आहे.
0 टिप्पण्या