!! बिगुल !!

निकालाआधीच आता एक्सिट पोल...
उमेदवारांचा जातोय मानसिक तोल...!
मतदारांसाठी फक्त आश्वासनांचे बोल... 
निवडणूकिनंतर अक्षरशः सर्व दावे फोल...!!

      काय असेल लोकशाहीत एका मताचे मोल...? 

सुरक्षारक्षकांचे नेत्यांना रिंगण गोल... 
इनकमिंग आऊटगोइंगचा सुरु आहे झोल...!
भ्रष्टाचारात अनेकांचे पाय अधिकच खोल... 
कायदाच निभावेल आपला पुढील रोल...!!

      काय असेल लोकशाहीत एका मताचे मोल...? 

सर्वात आधी अनामत रकमेचा टोल...
विजयानंतर वाजतील ताशा नि ढोल...!
कार्यकत्यांचे काम फक्त बटाटे सोल...
एकजुटीने आता निष्क्रिय व्यवस्थेला कोल...!!

      काय असेल लोकशाहीत एका मताचे मोल...? 

       बाळासाहेब भोर
( अ. भा.क्रांतीसेना, संगमनेर )

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या