अधिक माहीती अशी की, मुरमा येथील गोपाल थावर हा बारावीत शिक्षण घेत होता. गुरुवारी सकाळी घरातील सदस्य घरगुती कामे आटोपून शेतात गेले होते. सायंकाळी गोपाल थावर चा चुलत भाऊ शेतातील कामे करून घरी आला. त्यावेळी त्यांच्या घराचे दार आतून बंद असल्याचे आढळून आले. त्याने आवाज दिला असता त्याला कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही म्हणून त्याने घराच्या पत्र्यावरून घरात जाऊन दार उघडले असता त्याला गोपाल थावर ने घरातच पत्र्याच्या ॲंगलला गळफास घेतल्याचे निदर्शनास आले.
त्याने या घटनेची माहीती तात्काळ गावकऱ्यांसह गावचे पोलिस पाटिल विश्वनाथ मगरे यांना दिली असता त्यांनी तात्काळ पाचोड पोलिस ठाण्यात या घटनेची माहीती बीट जमादार किशोर शिंदे यांना कळविली. त्यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन गोपाल थावर यास खाली उतरुन पाचोड येथील ग्रामीण रूग्णालयात दाखले केले. तेथील वैद्यकीय अधिकारी डाँ.साबळे यांनी गोपाल यास तपासून मृत घोषित केले. या घटनेची नोंद पाचोड पोलिस ठाण्यात करण्यात आली असुन पुढील तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक गणेश सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी करीत आहे.
0 टिप्पण्या