टाकळीमियॉ गावात कोणीही विष पेरुन जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये- बाळासाहेब जाधव

मी चुकीचे समर्थन करणार नाही, म्हणून मी पक्ष सोडला आहे. मला गद्दार केलं गेलं, मात्र मी सत्याच्या बाजूने उभा आहे.

टाकळीमियॉ येथील घटने संदर्भात बाळासाहेब जाधव यांची पत्रकार परिषद.

देवळाली प्रवरा / राजेंद्र उंडे : टाकळीमिया ग्रामसभेत शिवाजी महाराज स्मारक उभारण्या वरुन झालेला वाद जिल्हाभर पोहचला असला तरी टाकळीमिया हे गाव एक कुटुंब आहे. आमच्या कुटुंबाच्या वादात बाहेरचे कोणी ही पडू नये. आमचा वाद आम्ही मिटवायला समर्थ आहे. बाहेरील व्यक्तींनी खतपाणी घालून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न चालवला आहे. मी स्वतः आठवले गटाच्या आरपीआय जिल्हा उपाध्यक्ष होतो. परंतू ग्रामसभेत खरा प्रकार कोणी ही जाणून न घेता विनाकारण टाकळीमिया गावास बदनाम केले जात असल्याने आरपीआयचा जिल्हा उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. या गावात सर्व समाज गुण्या गोविंदाने नांदत आहे. आम्ही सर्व समाज एकञ राहणार आहे. बाहेरील व्यक्तींनी आधी घडलेल्या घटनेची शहानिशा केली असती तर हा प्रकार गावातच मिटला असता. असे आरपीआयचे माजी जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब जाधव यांनी सांगितले आहे.

टाकळीमिया गावात 2 मार्च रोजी विशेष ग्रामसभा बोलविण्यात आली होती. या ग्रामसभेत शिवाजी महाराज यांचा अश्वरुढ पुतळा बसविण्यासाठी कमेटी व नियोजन आणि जागा निश्चितीसाठी विचार विनियम करण्याचे ठरले होते. परंतू गावातील एका महिलेने शिवाजी महाराज पुतळ्या बरोबर डाँ.बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे यांचे पुतळे उभारण्याची मागणी केली. त्यावेळी शिवाजी महाराज यांचा पुतळा ग्रामपंचायत मार्फत उभारला जात नसुन लोकवर्गणीतुन उभारला जाणार आहे. सध्या आपण शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्याबाबत विचार विनिमय करण्यास सांगितले. त्याच वेळी महिलेने वाद घालण्यास सुरवात केली. तीला समजुन सांगण्यात आले पण समजुन घेण्यास तयार नसल्यामुळे ग्रामसभेत वाद झाल्याने जिल्हाभर चर्चा झाली.
आरपीआय आठवले गटाचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब जाधव यांच्यासह गावकऱ्यांनी मियासाहेब दर्गा येथे पञकार परीषद आयोजित केली होती. यावेळी बोलताना ते म्हणाले की, छञपती शिवाजी महाराज, डाँ. बाबासाहेब आंबेडकर हे लहान नाहीत यांची किर्ती फार मोठी आहे. पुतळ्यासाठी आपसात वाद घालुन जातीय तेढ निर्माण करुन काय साध्य करणार आहे. शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास कोणी विरोध करीत असेल तर त्याचा जाहिर निषेध करतो. गेल्या 22 वर्षा पासुन आठवले यांचा कार्यकर्ता म्हणून काम करतो. पण मी आज त्या पक्षात नाही. माझ्या नेत्याचा माझ्यावर विश्वास नाही. चुकीचा कामाला मी समर्थन करणार नाही. सत्याच्या बाजुने उभा राहिलो म्हणून मला गद्दार म्हटले जाते. टाकळीमिया हे गाव एक कुटुंब आहे आणि कुटुंबात कोणी वाद निर्माण करणार असेल तर तो खपुन घेतला जाणार नाही. ग्रामपंचायतचा राजीनामा देण्याचे कारण काय सर्व समाजाने मला बिनविरोध निवडून दिले आहे. याला जातीय वाद म्हणायचा का? माझी भाऊजयला जिल्हा परीषद सद्स्य करण्यात आले. जर टाकळीमिया गाव जातीयवादी असते तर माझ्या सारख्याला बिनविरोध होवू दिले असते का? असा प्रश्न यावेळी उपस्थित केला.

जाधव पुढे म्हणाले की, टाकळीमिया गावात अश्वरुढ पुतळा होणारच त्याच बरोबर ग्रंथालयास डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात येणार आहे. सर्वांना बरोबर घेवून विचाराची लढाई विचाराने करावी. आर्दश गाव आहे. आम्हाला शिवाजी महाराज व डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करायचे आहे. वाद घालायचे नाही. शिवाजी महाराज पुतळ्यासाठी 21 हजार रुपयांची वर्गणी जाहिर करतोय. टाकळीमिया गावात सर्व जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदाने राहतात. चांगले काम करताना वाईट गोष्टी पुढे येत असतात. गावात कोणीही जातीय तेढ निर्माण करीत नाही. मी गावाबरोबर व गाव माझ्याबरोबर आहे. जिल्ह्यातील आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी या घटनेची खाञी करणे गरजेचे होते. वाद हा गावात मिटला असता परंतू घटनेची शहानिशा करणे गरजेचे होते. या घटनेत विष पेरण्याचे काम बाहेरच्यांनी केले आहे. ग्रामसभेत मी उपस्थित होतो. वाद झालेच नाही. पोलिसांनी ग्रामसभेचे उपस्थितीचे दप्तर ताब्यात घेवून उपस्थितांचे जबाब घ्यावे. म्हणजे दुध का दुध पाणी का पाणी होईल, असे जाधव यांनी सांगितले.

यावेळी शामराव निमसे, सुभाष जुंदरे, सुभाष करपे, ज्ञानदेव निमसे, प्रभाकर करपे, जिजाबा चिंधे, सुभाष चोथे, गुलाबराव निमसे, सुरेश निमसे, भागवत नवाळे, राहुल चोथे, संदिप विधाटे, भाऊसाहेब पगारे, साहेबराव निमसे, सुरेश भानुदास निमसे आदींसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या