देवळाली प्रवरा / राजेंद्र उंडे : कोरोना काळात अचानक आलेल्या अपंगत्वामुळे सचिन पलाले हा तरुण गेल्या दोन वर्षापासुन एका जागेवर होता. त्याची हालचाल व समाजाशी पुन्हा स्नेहभाव वाढावा यासाठी राहुरी फॅक्टरी येथील शिवबा प्रतिष्ठानच्या वतीने दत्तनगर भागातील अपंग सचिन पलाले या तरुणास तीन चाकी सायकलची भेट शिवबा प्रतिष्ठानचे संस्थापक तथा माजी नगरसेवक अदिनाथ कराळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.
शिवबा प्रतिष्ठानने सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर राहुन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. यापुर्वी अपंग व गोरगरीबांना मदतीचा हात दिला आहे. जेथे मदतीची गरज भासेल तेथे शिवबा प्रतिष्ठान खंबीरपणे उभे राहते. राहुरी फँक्टरी येथिल दत्तनगर भागातील गरीब कुटुंबातील सचिन पालाले या तरुणास अपंगत्व आल्याने या तरुणासह माता पित्याने शिवबाच्या कार्यकर्त्यांची भेट घेतली. सचिन पलाले याने अदिनाथ कराळे यांच्याकडे मला समाजात मिसळण्यासाठी मला तीन चाकी सायकल मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली. कराळे यांनी पलाले यास शब्द दिला. दिलेला शब्द शिवबा प्रतिष्ठानने पाळला. त्यानुसार शुक्रवारी सायंकाळी दत्तनगर येथील मंदिरात सचिन पलाले या तरुणास सायकल प्रदान करण्यात आली.
यावेळी माजी नगरसेवक आदिनाथ कराळे, सिद्धार्थ कड, अजय गीते, अक्षय कुऱ्हाडे, शुभम वास्कर, रोहित वाकचौरे, शोएब शेख, शुभम वास्कर, विकास शेकडे, सुशांत भोसले, सुरेश कदम, श्याम माळवदे, राहुल दळवी, साहिल पवार, नागेश शेकडे, मनोज जाधव, दत्तू लहारे, विजयकुमार खळेकर, अशोक शिंदे, संतोष धावडे, प्रशांत ढोकणे, विरेन नेहे, शुभम नवले, प्रतीक कोल्हे, वैभव राऊत, साविञी उडबत्ते, संगिता पलाले, जयाबाई कोल्हे आदी उपस्थित होते.
0 टिप्पण्या