सुसंस्कार हीच आपल्या जीवनातील उत्तम संचयिका- मधुकर बिरहारे


पैठण : शालेय जीवनात आपल्यावर झालेले सुसंस्कार हीच आपल्या जीवनातील उत्तम संचयिका आहे. ती वृद्धिंगत करावी असे प्रतिपादन मुख्याध्यापक मधुकर बिरहारे यांनी केले. पैठण तालुक्यातील बिडकीन सरस्वती भुवन प्रशालेत इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित निरोप समारंभात ते अध्यक्ष म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मुख्याध्यापक मधुकर बिरहारे, उपमुख्याध्यापक राजेंद्र कोठावदे, श्रीमती बाविस्कर, लक्ष्मीकांत जोशी, मनोज बोराडे, जगन्नाथ राऊत, हेमा मिरजकर उपस्थित होते. 

सर्वप्रथम मुख्याध्यापक मधुकर बिरहारे, उपमुख्याध्यापक राजेंद्र कोठावदे यांनी राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केले. यावेळी बोलताना मुख्याध्यापक बिरहारे यांनी विद्यार्थ्यांनी जिद्द, मेहनत व परीश्रम या त्रिसूत्रीच्या जोरावर यशोशिखरावर जावे. विद्यार्थ्यांनी शालेय व महाविद्यालयीन जीवनात मिळालेल्या शिक्षणाचा उपयोग उत्तम चारित्र्य निर्माण करण्यासाठी करावा असे सांगितले. यावेळी सुनिता बाविस्कर, लक्ष्मीकांत जोशी, मनोज बोराडे यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पायल धुमाळ, गायत्री वाघ, साहु किर्ती, पुष्पा लक्ष्मी प्रसाद , तनुजा तेजिनकर, महेश भुरे, श्रावणी शिंदे,साक्षी कुडूक यांनी शाळेविषयी कृज्ञतापूर्वक ऋण व्यक्त करून मनोगत व्यक्त केले. इयत्ता दहावीच्या सर्व तुकड्यातील विद्यार्थ्यांनी प्रशालेस आठवण भेटवस्तू दिली. याच कार्यक्रमात मुख्याध्यापक बिरहारे यांनी महिला दिनानिमित्त सर्व शिक्षिका भगिनी यांच्याविषयी आदर व्यक्त शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र नागरे तर आभार संजिवनी काथार यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी संसद यांनी प्रयत्न केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या