श्रीरामपूर [ बाबासाहेब चेडे ] : लोकांच्या प्रश्नाच्या अनुरोधाने, पुस्तक लिहिले, माझ्या कविता ९ वी, १० वीच्या ३८ लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना पुस्तकातून शालेय अभ्यासासाठी लिहिल्या, इतर माझे साहित्य विद्यापीठात आहे. बीडीओ असताना विविध विभागाचे अधिकारी यांना एकत्र घेऊन गावात जाऊन ग्रामसभा घेऊन तेथेच समस्या सोडविल्या जायच्या, दुर्दैवाने बराच मोक्याचा काळ कोरोनामध्ये गेला. येथे उपजिल्हा रुग्णालय दर्जा मिळाला. अनेक अधिकारी आले, एमायडीसी मध्ये विजेचे २२० के व्ही सब स्टेशन मंजूर केले त्यामुळे विजेच्या सर्व समस्या दूर होतील, ज्यांनी माझ्यावर मोठा विश्वास दाखविला मला आज मोठे पद दिले कायदा करणारा माणूस बनविले त्या जनतेसाठी वाटेल तो संघर्ष करून ऋण फेडेन, माझे स्वप्नातले गाव पुस्तक येत आहे त्यात गावाची गोष्ट आहे. तेथे स्वातंत्र्य आहे, समता, बंधुता, लोकशाही, सामाजिक न्याय आहे असे सर्व काही आहे. अशीच माझी अपेक्षा आहे.
त्याप्रमाणे मी प्रत्येक गावात जाऊन ग्रामस्थांच्या समस्या समजून घेणार आहे, २ दिवसात वीज मंडळ अधिकारी व विविध गावचे ग्रामस्थ यांची समस्यावर संवाद बैठ घेणार आहे. अशा प्रकारे ना.बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली कॉंग्रेस पक्षाला बळकटी येईल. त्यांचे सभ्य नेतृत्व लाभले आहे.यापुढे कामानो तुम्ही लोकांना सांगा काय काय काम केले ते? आदी प्रतिपादन पक्ष सभासद नोदणी शुभारंभ प्रसंगी आ.लहूजी कानडे यांनी केले.
श्रीरामपूरचे विद्यमान आ. लहू कानडे हे मुंबई अधिवेशनाहून येताच शिरसगाव येथे कॉंग्रेस पक्ष सभासद नोंदणी अभियानाचा शुभारंभ महसूलमंत्री ना.बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आ.लहू कानडे यांच्या शुभहस्ते व जेष्ठ नेते इंद्रनाथ थोरात, ज्ञानेश्वर मुरकुटे यांच्या उपस्थितीत जेष्ठ शेतकरी माधव पवार यांच्या नोंदणीने करण्यात आला. ना.बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाने ३०० कोटी रु.ची रस्त्याची कामे मार्गी लावली आहेत, येत्या ४ दिवसात विजेच्या महत्वाच्या प्रश्नावर वीजमंडळ अधिकारी यांचेसोबत थेट शेतकऱ्यांशी संवाद बैठक ठेवणार असल्याचे आ.कानडे यांनी सांगितले.
कार्यक्रमास शिरसगाव सोसायटी अध्यक्ष साईनाथ गवारे, उपाध्यक्ष चांगदेव बकाल, माजी सरपंच सतीश गवारे, संचालक नानासाहेब गवारे, रामचंद्र पाटील, विधिज्ञ गजानन बकाल, मच्छिंद्र गवारे, संजय गायकवाड, इसाक पठाण, अण्णासाहेब गवारे, बाळासाहेब बकरे, बाळासाहेब यादव, शंकरराव गायकवाड, अशोकराव जोंधळे, संजय गवारे, सुभाष बोंबले, शामराव पुरनाळे, शंकरराव ताके, बाबासाहेब बकाल, लक्ष्मणराव गवारे, अशोकराव रासकर, शशिकांत गवारे, प्रवीण गवारे, मच्छिंद्र गवारे, गजाबापू गवारे, भाऊसाहेब शिंदे, प्रदीप गवारे, भाऊ यादव, सुरेश ताके, सुभाष यादव, ग्रामपंचायत सदस्य संदीप भालेराव, रामदास गवारे, आदी उपस्थित होते. सूत्र संचालन, प्रास्तविक किशोर पाटील यांनी आभार प्रदर्शन बाळसाहेब गवारे यांनी केले.
0 टिप्पण्या