अहमदनगर/ जावेद शेख : हिंद सेवा मंडळ श्रीरामपूर व अकोले विभाग तसेच पेमराज सारडा महाविद्यालय सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुरुषोत्तम करंडक विजेत्या एकांकिकाचा महोत्सव श्रीरामपूर शहरातील खा.गोविंदराव आदीक नाट्यगृहात प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादात मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
नटराजपूजन दीपप्रज्वलन व रंगमंचपूजनाने महोत्सव शुभारंभ झाला. यावेळी ज्येष्ठ नेते व अशोक उद्योग समूह सूत्रधार भानुदास मुरकुटे, साईबाबा संस्थान विश्वस्थ सचिन गुजर, माजी नगराध्यक्षा तथा साईबाबा संस्थान विश्वस्थ अनुराधाताई आदिक, श्रीशक्ती ग्रुपच्या अध्यक्षा दिपालीताई ससाणे, श्रीमती पुष्पलता आदिक, माजी नगराध्यक्षा इंदुमती डावखर, नारायण डावखर, माजी नगराध्यक्ष अनिल कांबळे, माजी उपनगराध्यक्ष संजय छल्लारे, नगरसेविका भारतीताई कांबळे, हिंद सेवा मंडळ अध्यक्ष शिरीष मोडक, कार्याध्यक्ष अजित बोरा, डॉ पारस कोठारी, अनंत फडणीस, मकरंद खेर, सुमतीलाल कोठारी, जगदीश झालानी, सुजित बेडेकर, अशोक क्षिरसागर, सतीश बूब, दिलीप शहा, अनिल जोशी, मोहन कुकरेजा, अनिल देशपांडे, अशोक उपाध्ये, राजेंद्र जोशी, रणजित श्रीगोड, पुरुषोत्तम मुळे, बापूसाहेब जोक, अरुण धर्माधिकारी, अनिल कुलकर्णी, शशी भुतडा, सुनील पंडित, शरद लोंढे, चंद्रकांत सगम, माजी उपनगराध्यक्ष सुनील बोलके, विजय शिंदे, अशोक थोरे, विजय नगरकर, माणिक जाधव, डॉ.नवनीत जोशी, नंदकुमार आंभोरे, प्राचार्य राजेंद्र शिंदे, मिलिंद देशपांडे, सहाय्यक सचिव बी.यू कुलकर्णी, योगेश देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांचे स्वागत व प्रास्ताविक हिंद सेवा मंडळाचे मानद सचीव संजय जोशी यांनी केले. नाट्यप्रयोग सुरू होण्यापूर्वी प्रा. आदिनाथ जोशी यांनी सुमधुर आवाजात नांदी सादर केली व त्यानंतर पी ,सी ओ व सहल या एकांकिका सादर झाल्या. दोन्ही एकांकिकाना श्रीरामपूरकरांनी उस्फुर्त दाद दिली. दरम्यान मध्यांतराच्या कालावधीत कलाकारांचा सत्कार करण्यात आला. सुरवातीला दोन्ही एकांकिकेतील संयुक्त कलाकार श्रुता भाटे, विशाल साठे, आविष्कार ठाकूर, वैष्णवी लव्हाळे, स्वराज अपूर्वा यांचा हिंद सेवा मंडळाच्या वतीने स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आल्यानंतर अनुक्रमे पी.सी.ओ मधील मोनिका ठाकूर, विनोद गरुड, अमोल साळवे, स्वराज अपूर्वा, शर्वरी अवचट, मयुरेश मोरे, सोहम दायमा, नितु सहानी, संकेत निकम, रेवती शिंदे, तर सहल या एकांकिकेतील मनू शर्मा, गौरी डांगे, निरंजन केसकर, समर्थ अरुणे, मंजिरी जोशी, समर्थ खळदकर, संकेत दंडवते, तसेच दादा वामन जोशी नवीन मराठी शाळा व क.जे.सोमय्या हायस्कूल चे माजी विद्यार्थी डॉ.शेखर प्रकाश मेहकरकर यांचाही हिंद सेवा मंडळाच्या तर्फे सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
एकांकिका महोत्सवास अकोले व श्रीरामपूर विभागातील सर्व सन्मानिय संचालक आजीव सदस्य, निमंत्रित मान्यवर, शाळांचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक सेवकवृंद यांची मोठी उपस्थिती होती. सभागृह महोत्सवाच्या निमित्ताने पूर्ण क्षमतेने भरले होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अधिक जोशी, कल्याण लकडे, नवनाथ जंगले, सचिन मुळे, पंजाबराव भोसले, वैभव गायकवाड, सुरेंद्र पाटील, अवधूत कुलकर्णी, सचिन चंदन, राकेश शिंदे यांनी परिश्रम घेतले. एकांकिका महोत्सवाचे बहारदार सूत्रसंचालन प्रा सतीश म्हसे, आदिनाथ जोशी यांनी केले.
0 टिप्पण्या