युवांश फाउंडेशनचा आदिवासी भागात संवाद दौरा

विलास लाटे/ ढोरकीन : यंग फाउंडेशन धुळे व डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय मोराणे आयोजित गुऱ्हाळपाणी (ता.शिरपूर जि.धुळे) येथे आदिवासी लोकजीवन अध्ययन शिबीराच्या पाचव्या दिवशी युवांश फाउंडेशन औरंगाबाद तर्फे सचिव किशोर चाटूपळे व कार्यकारी अध्यक्ष पुजा नरवडे यांनी शुक्रवारी (दि.२५) उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

यावेळी किशोर चाटूपळे यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील महिला, युवक, शेतकरी यांच्यापर्यंत शासकीय योजना, विकासात्मक धोरणे पोहचवतांना बऱ्याचशा गोष्टींच्या अडचणी येतात परंतु याच जर आपण लोकसहभागातून घेऊन गेलो तर त्या शाश्वत पद्धतीने रूजवल्या जातात. त्याबरोबर पुजा नरवडे यांनी संवादातून ग्रामीण भागात महिलांच्या प्रश्नांवर काम करतांना येणाऱ्या अडचणींना सामोरे जातानांचे काही अनुभव सांगितले. तसेच यंग फाउंडेशचे सर्वेसर्वा डॉ. संदीप देवरे यांनी वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन करत आदिवासी भागात शाश्वत गोष्टी करण्यासाठी विविध प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागले. परंतु लोकसहभागाशिवाय विकास शक्य नाही. त्यामुळे नेहमीच सर्वांना सोबत घेऊन काम करायला पाहिजे.

यावेळी उपस्थित युवांशचे कोषाध्याक्ष शुभम शेळके, उपाध्यक्ष आशुतोष नरवडे, तसेच महाविद्यालयाचे प्राध्यापिका डॉ प्रिती वाहने, प्राध्यापक आहिरे, यंग फाउंडेशनचे फेलोशिपचे विद्यार्थी तसेच विविध जिल्ह्यातुन आदिवासी लोकजीवनाचा अभ्यास करण्यासाठी आलेले मुले मुलीं उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या