आपले सरकार आपल्या दारी या ना. तनपुरे यांच्या संकल्पनेतून म्हैसंगाव येथे आधार कार्ड नोंदणी, दुरुस्ती व ई- श्रम कार्ड शिबिर

राहुरी : ऊर्जा राज्यमंत्री ना. प्राजक्त तनपुरे यांच्या राहुरी येथील जनसंपर्क कार्यालयातर्फे आयोजित आपले सरकार आपल्या दारी अंर्तगत आधार कार्ड नवीन व दुरुस्ती तसेच ई - श्रम कार्ड तयार करण्यासाठी श्री केदारेश्वर माध्यमिक विद्यालय म्हैसंगाव येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबीराचे उद्घाटन बाजार समितीचे उपसभापती बापूसाहेब गागरे पाटील व  ना. प्राजक्त तनपुरे यांचे स्वीय सहाय्यक दत्ता कदम यांच्या हस्ते झाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष विलासराव गागरे, अशोक कर्डे, नानासाहेब देशमुख, सचिन गागरे,  सखाहरी आग्रे, महादराव चोपडे, नवनाथ गुलदगड, स्वप्नील गागरे, सावित्रा गुलदगड, किरण विधाटे, अनिकेत विधाटे, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.मुसळे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

श्री केदारेश्वर माध्यमिक विद्यालय म्हैसंगाव येथे आधार दुरुस्तीचे शिबिर आयोजित केल्याबद्दल शाळेच्या वतीने दत्ता कदम यांचा सत्कार बापूसाहेब गागरे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच आधार कार्ड कॅम्पचे चालक व सहकारी मित्र व सर्व मान्यवराचे पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक कर्डे यांनी केले तर आभार कणसे यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या