शेतकऱ्यांची होतेय आर्थिक कोंडी; उत्पादन खर्चही निघेनासा झाल्याने कर्जाचे हप्ते फेडायचे कसे?
विजय चिडे/ पाचोड : पावसामूळे शेतकऱ्याचे कधी होत्याचे नव्हते होईल, याचा कधीच नेम अथवा अंदाज बांधता येत नसतो. सप्टेंबर महिन्यात झालेल्या ढगफुटीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या बाबतीत हे पुन्हा एकदा तंतोतंत आणि खरं ठरवलं होतं. पदरात पडण्यापूर्वीच शेतामधील उभी पिके डोळ्या देखत वाहून गेल्याचे दृश्य शेतकऱ्यांनी बघितले तर त्यांची केविलवाणी झालेली वाईट अवस्था न बघण्यासारखी झालेली होती.
एकदम ओढावलेल्या अस्मानी संकटाने शेतकऱ्यांचे स्वप्न पण वाहून नेले हे प्रसंग आणि डोळ्यातून निघणाऱ्या अश्रूंचे विदारक चिञ ढगफुटीच्या पावसाने झालेल्या शेतीच्या नुकसानीतून समोर आल्याचे पाहावयास मिळते. अतिवृष्टी आणि ढगफुटी सारख्या पडलेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या स्वप्नावर अक्षरशः पाणी फिरवले. पाऊस इतके पडले की शेतातील पिके पाऊसा समोर तग न धरु शकल्याने पिके पावसाच्या प्रवाहात वाहून उध्वस्त झाली होती.
त्याच पुन्हा गतदोन वर्षापासुन कोरोणां डोक्यावर आधीच कोरोना संकट, त्यात बदलते वातावरण, शेतमालाला बाजारभाव न मिळणे आदीमुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. त्यातच सोसायट्या, पतसंस्था, बँका व सावकार यांच्याकडून सक्तीची वसुली सुरू आहे. मार्च एंडिंग'मुळे सोसायटी भरणा, पाणीपट्टी, घरपट्टी व कर्जाचे हप्ते तातडीने भरणे गरजेचे आहे. यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. समाजातील सर्वांत दुर्लक्षित घटक म्हणजे शेतकरी वर्षानुवर्ष हाल अपेष्टा सहन करून, रक्ताचे पाणी करून, कर्ज काढून जमीन कसतो व सर्वतोपरी प्रयत्न करून पिके घेण्याचा प्रयत्न करतो. परंतु सततची नापिकी, दुष्काळ निसर्गाचा लहरीपणा, रोगराई, गारपीट आदींमुळे शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी शेतमाल मातीमोल भावात विकावा लागल्याने कर्जाचा भरणा करायचा कसा, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा आहे तसेच शेतमालाला योग्य भाव न मिळणे, व्यापारी व दलालांकडून होणारी लूट, फसवणूक, शेतीविरोधी धोरण, पीक विम्याचा खेळखंडोबा आदींमुळे शेतकरी संकटात सापडला आहे.
कर्जाच्या परतफेडीसाठीची गणिते करण्यात शेतकरी व्यस्त आहे. बँक, सहकारी संस्थांची संभाव्य नोटीस, मुलांचे शिक्षण, कुटुंबाचे रेशन, घर दुरुस्ती व इतर किरकोळ खर्चाचा विचार करता शेतकऱ्यांची झोपच उडाल्याचे चित्र दिसत आहे.
यंदा झालेल्या अतिवृष्टीने झालेलं नुकसान भरपाई रब्बीमध्ये होईल या आशेने शेतकरी पुन्हा कामाला लागले. मात्र याहीवेळी निसर्गाचा लहरीपणा, ढगाळ वातावरण, अवकाळी पाऊस, गारपीट याने शेतकऱ्यांची होती नव्हती आशा धुळीस मिळाली. कर्जाच्या परतफेडीला कात्री बसली. उचललेले कर्ज ३१ मार्चपूर्वी भरले नाही तर पुन्हा त्यावर बसणारे व्याज़ यामुळे कर्जाचा डोंगर उभा राहिल्या शिवाय गत्यंतर नाही.याच भीतीने काहींनी होते नव्हते होतं आहे._ मुरलीधर निर्मळ, शेतकरी.
मानगुटीवर कर्जाचा डोंगरमागील वर्षी व त्याआधी तुटपुंज्या पावसामुळे दुबार पेरणी करावी लागली. त्यानंतर कशीबशी रोवणी उरकून शेतकरी चांगल्या पिकाची आस करत राहिला; परंतु अपुरा पाऊस व रोगराईमुळे प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या हातात फार कमी उत्पादन मिळाले. तरीही शेतकऱ्यांनी पोटाला चिमटा घेत कसे तरी खते, कीटकनाशके व बियाणे यांचा खर्च भरून काढला. मात्र बँका, शहरी संस्था व सावकारी कर्ज तसेच राहिले._ अमोल निर्मळ, शेतकरी.
सयंदा शेतकरी एका पाठोपाठ एका संकटाशी सामना करत आहे.नूकते मार्च 'एंडिंग' ची वसुली वेगवेगळ्या संस्थेकडून सक्तीची सुरू आहे. मार्च एंडिंग'मुळे खाजगी फायनसचे कर्जाचे हप्ते तातडीने भरणे गरजेचे आहे. यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे तरीही संबंधित संस्थासह फायनस यांच्या सर्वांनी कर्जदारांना तंग करू नये._ धनराज भुमरे, सामाजिक कार्यकर्ते.
0 टिप्पण्या