राहुरी / बाळकृष्ण भोसले - देशाचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी नाभिक समाजाबद्दल अपशब्द वापरून समाजाचा अपमान केला आहे. राजकीय भाषणे देताना बहुजन समाजाला उद्देशून भाषणे देण्यासाठी बहुजन समाजातील जाती यांच्या दावणीच्या जहागिऱ्या नाहीत ३ वर्षापूर्वी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आता रावसाहेब दानवे यांनी बहुजन समाजातील नाभिक समाजाचा निंदनीय अपमान केला आहे. त्यांचा तातडीने राजीनामा घ्यावा व समाजाची जाहीर माफी मागावी अन्यथा दानवेंच्या निवासस्थानी केशमुंडन आंदोलन करण्यात येणार असल्याचे समाजाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, नाभिक समाजाच्या भावना तीव्र आहेत त्यांनी समाजाची जाहीर माफी मागावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत आपणास निवेदन देण्यात आले. परंतू त्यावर कार्यवाही झाली नाही. त्यामुळे बुधवारी १६ मार्चला संपूर्ण राज्यभर नाभिक समाजासह बहुजन समाजातील अनेक जातीसमुहांनी रस्त्यावर उतरून निदर्शने केली व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदने देण्यात येत आहेत.
येत्या आठ दिवसांत समाजाची माफी मागितली नाही तर केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या जालना येथील निवासस्थानी लाखोंच्या संख्येने राज्यातील नाभिक समाजबांधव जमा होऊन केशमुंडन आंदोलन करण्यात येणार आहे, याची सर्वस्वी जबाबदारी शासनावर राहणार असल्याचे निवेदनात म्हटले असून निवेदनावर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, माऊली गायकवाड, बाळू औटी, आप्पा मगर, बाबूराव दळवी, संतोष भालेराव, श्रीपाद वाघमारे, विशाल सैंदाणे, पांडुरंग शिंदे आदींच्या सह्या आहेत.
0 टिप्पण्या