म्हैसगाव येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

राहुरी : तालुक्यातील म्हैसगाव येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा परिषद मराठी शाळा, अंगणवाडी सेविका व आशा सेविका यांनी आयोजित केलेल्या महिला दिनाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीच्या मा अध्यक्षा राजश्री जोशी होत्या तर प्रमुख पाहुणे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष विलासराव गागरे, म्हैसगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे मेडिकल ऑफिसर डॉ अंजली मंडलिक, केदारेश्वर माध्यमिक विद्यालय म्हैसगाव स्कूल कमिटी अध्यक्ष प्रविण दुधाट, डॉ अर्चना लेंभे, डॉ दिपक पिसाळ, डॉ मंगेश वेदपाठक, विठ्ठलराव नेहे, कदम सिस्टर, दिघे सिस्टर, वनिता दुधाट, डोखे मॅडम, स्वाती गोडे, ज्योती निमसे, सुनिता हुलूळे, मोनिका गागरे, प्रिंयका काजाळे, कविता दुधाट, मंगल विधाटे, स्नेहा गोसावी, रोहिणी शेजवळ, स्वाती दुधाट, वर्षा दुधाट, सुवासणी विधाटे, तारा शेलार आदी उपस्थित होते.
    म्हैसगाव सरपंच महिला असून सुद्धा या जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमाकडे फिरवली पाठ ...
कार्यक्रमांची सुरुवात राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला हार घालून मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. पाहुण्यांचे स्वागत कु सिद्धी योगेश दुधाट व कु खुशी सचिन गागरे या मुलींनी गाण कोकिळा लता मंगेशकर व सावित्रीबाई फुले यांचा वेशभूषा करून हरमोनियम च्या स्वरात करून मान्यवरांचे मने जिंकली. महिला दिनाचे औचित्य साधून म्हैसगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मेडिकल ऑफिसर डॉ अंजली मंडलिक यांना शिवगौरव पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल त्यांचा म्हैसगाव पंचक्रोशी व गागरे परिवाराच्या वतीने मोनिका गागरे यांनी सत्कार केला. प्राथमिक मराठी शाळेच्या वतीने प्रत्येक महिलांचा ग्लास पुष्प देऊन डॉ मंडलिक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच महिलांना आरोग्य विषयी कशी काळजी घ्यावी या विषयावर डॉ मंडलिक, डॉ अर्चना लेंभे, सिमा दिघे सिस्टर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
विलासराव गागरे यांनी महिला दिनानिमित्त उपस्थित असलेल्या महिलांना शुभेच्छा दिल्या शेवटी अध्यक्ष भाषणाने समारोप करून मुलांना महिलांना शाळेच्या वतीने अल्पाहार देऊन कार्यक्रम गोड करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केंद्र प्रमुख विष्णू खामकर यांनी केले व आभार गोपीनाथ तळपे यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या