लोकप्रतिनिधी कसा असावा याचे मुर्तिमंत उदाहरण म्हणजे आ.निलेश लंके !

पारनेर - नगर विधानसभा मतदारसंघात २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत प्रथमच विस्थापित व सर्वसामान्य कुटुंबातील आ.निलेश लंके या युवकाच्या रूपाने प्रस्थापित राजकारण्यांच्या छाताडावर परिवर्तनाचा विजयी झेंडा रोवला गेला. खरंतर प्रस्थापितांसमोर राजकीय आव्हान उभं करणं एवढी सोपी गोष्ट नव्हती. परंतु आमदार निलेश लंके यांनी संघटन कौशल्याच्या व थेट जनतेशी असलेल्या संपर्काच्या जोरावर ते उभं केलं व नेञदिपक यशही संपादन केले.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत प्रथमच निवडुन गेलेले आ.निलेश लंके हे सर्वच दृष्टीने नवखे होते. परंतु त्यांनी आपल्या कर्तृत्वाने व बुद्धिमतीची चुणूक दाखवत अल्पावधीतच राज्यातीलच नव्हे तर देशातील लोकप्रतिनिधी व राजकारण्यांसमोर एक अनोखा आदर्श निर्माण केला. कोरोना सारख्या महामारीच्या संकटामुळे संपूर्ण जग बंद होत, या दरम्यान प्रत्येकजण या संकटापासून आपला जीव वाचविण्यासाठी घरबंद करून बसला होता. माञ अशा भयंकर स्थितीत सुद्धा लोकांचे जीव वाचविण्यासाठी व लोकांना सर्वोतोपरी मदत करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणारा महाराष्ट्रातील एकमेव लोकप्रतिनिधी होता आणि तो म्हणजे आमदार निलेशजी लंके ! 

खरं म्हणजे लोकप्रतिनिधी हा जनतेचे मुलभूत प्रश्न सोडविण्यासाठी, विकासात्मक कामे करण्यासाठी व सरकारला जनहिताचे धोरण व कायदे करायला लावण्यासाठी असतो, हा आजवरचा सर्वांचा अनुभव होता. परंतु याही पलीकडे जाऊन जनतेच्या दुःखात व अडचणीच्या काळात त्यांना थेटपणे मदत करणारा लोकप्रतिनिधी माञ पारनेर - नगर विधानसभा मतदारसंघानेच नव्हे तर संपूर्ण देशाने पहिल्यांदाच पाहिला. आ.लंके यांच्या या सामाजिक कार्याने राजकारणाची व लोकप्रतिनिधीची परिभाषाच बदलून टाकली. छञपती शिवरायांना, छञपती शाहु महाराजांना, महात्मा गांधींना, महात्मा ज्योतिबा फुलेंना व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेले कार्य आमदार निलेशजी लंके हे करताहेत हि बाब निश्चितच आम्हा सर्व मतदारसंघातील जनतेसाठी अभिमानास्पद आहे.

आ.लंके यांनी कोरोना काळात केलेले उल्लेखनीय कार्य व त्यामुळे त्यांची संपुर्ण महाराष्ट्रातील जनसामान्यांच्या मनात निर्माण झालेली प्रतिमा हि त्यांच्या भविष्यातील राजकारणासाठी व मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी निश्चितच उपयुक्त ठरेल ! राज्यातील जनतेतून त्यांना मिळत असलेला पाठिंबा हा अधिकाधिक वाढतच जाईल व एके दिवशी आ.निलेश लंके हे राज्याचे नेते म्हणून नावारूपास येतील असा मला दृढ विश्वास आहे. आ.लंके यांची सामाजिक कार्यातुन निर्माण झालेली प्रतिमा व त्यातुन निर्माण झालेला आदरयुक्त दबदबा आज क्षणोक्षणी राज्याच्या राजकारणात अनुभवायास मिळतो आहे. राज्य सरकारमधील मंञी देखील आमदार निलेशजी लंके यांचे कुठलेही काम टाळत नाहीत. यामुळे अवघ्या अडीच, तिन वर्षातच पारनेर - नगर विधानसभा मतदारसंघात शेकडो कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करण्यात ते यशस्वी झाले.

राज्य स्तरावरील असा एकही विभाग शिल्लक राहिला नाही की ज्यामधुन आ.लंके यांनी विकासनिधी आणला नाही. जनतेला अभिप्रेत अशी कामे आ.निलेश लंके करत असल्यामुळे मतदारसंघात देखील त्यांचे पाठबळ वाढतंच चालले आहे. त्यांची समाजाप्रती असलेली बांधिलकी ते सातत्याने वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांचे आयोजन करून दाखवुन देत आहेत. त्यांचा थेट जनतेशी असलेला संपर्क व जनतेच्या सुख दुःखात सहभागी होण्याची त्यांची वृत्ती तसेच लहानग्यांपासुन ते अबालवृध्दांपर्यंत सर्वांशी थेटपणे संवाद साधुन सर्वांना सन्माने वागवण्याची त्यांची पद्धत हिच त्यांच्या यशाची गुरुकिल्ली आहे. आ.निलेश लंके यांचा १० मार्च रोजी जन्मदिवस आहे. त्यांना उदंड आयुष्य व निरोगी आरोग्य लाभो व त्यांना प्रदिर्घ काळ लोकप्रतिनिधी म्हणुन जनतेची सेवा करण्याची संधी मिळो हिच त्यांच्या जन्मदिनानिमित्त आई जगदंबे चरणी प्रार्थना...!
_ अनिल देठे पाटील, शेतकरी नेते मो. ९३५९०५०५५२

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या