| ढाकेफळ ता.पैठण येथे सिमेंट रस्ता कामाचे भूमिपूजन करताना सतिश शेळके, रवींद्र शिसोदे, किशोर शिरवत आदी. |
◾नामदार भुमरे यांनी दिलेला शब्द पाळला...
पैठण : तालुक्यातील ढाकेफळ येथे आमदार निधीतून मशिद परिसर व मारोती मंदिर परिसरात (दि.१०) रोजी सिमेंट रस्ता कामाचे भुमिपुजन विलास बाप्पु भुमरे प्रतिष्ठानचे सचिव सतिष पाटील शेळके यांच्या हस्ते करण्यात आले. हे काम पुर्ण करण्याचा मंत्री संदिपान भुमरे यांनी शब्द दिला होता. तो शब्द पाळत मंत्री भुमरे यांनी आमदार निधीतून निधी उपलब्ध करून दिला. या कामाचे भुमिपुजन होवून प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाल्याने मंत्री भुमरे व माजी सभापती विलास भुमरे यांचे ग्रामस्थांनी आभार मानले आहेत.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य रवींद्र शिसोदे, छावाचे जिल्हाध्यक्ष किशोर पाटील शिरवत, सरपंच भीमाराव मोरे, वाहेद पटेल, कैलास शिंदे, संजय मरकड, मनेष आव्हाड, इम्रान पठाण, डॉ.रफिक शेख, हरिभाऊ कोल्हे, काकासाहेब रणशुर, मच्छींद्र मरकड, संकेत शिंदे, अमोल अव्हाड, रामनाथ बेडके, तुषार शिसोदे, शौकत शेख, कडुबाळ डोळस, विलास अव्हाड, कल्याण कोल्हे, ईसाक पठाण, अशोक मोरे, सुनिल अव्हाड, फारुक भाई, भारत शिंदे, अक्षय शिरवत, योगेश नजन, ऋषिकेश शिंदे, मनोज वंजारे, सुमित शिरवत, भारत शिरवत, अमोल सोलाट, भगवान सोलाट यांच्यासह आदी पदाधिकारी, कार्येकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या