स्वराज्य पोलीस मित्र संघटनेच्या कार्याध्यक्षपदी आहेर

अहमदनगर/ जावेद शेख : स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती आधिकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दिपक कांबळे व मुख्य महासचिव कमलेश शेवाळे देवा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस मित्र संघटनेच्या अहमदनगर जिल्हा कार्याध्यक्ष तथा प्रसिद्धीप्रमुख पदी संतोष विष्णु आहेर यांची निवड करण्यात आली.

अहमदनगर जिल्हाध्यक्ष सचिन चांदघोडे यांच्या मुख्य कार्यालयात महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख भरतजी नजन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मिटींग मध्ये संतोष आहेर यांची निवड करण्यात आली. त्यावेळी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सचिन दिघे, अहमदनगर जिल्हा समन्वयक चव्हाण मामा, सामाजिक कार्यकर्ते संतोषजी जावळे, नेवासा तालुकाध्यक्ष जावेदभाई सय्यद, राहुरी तालुका सदस्य आलमभाई सय्यद, लहानु जोशी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या