युवक काँग्रेस पैठण तालुका अध्यक्षपदी निखील काळे यांची निवड

पैठण युवक कॉंग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर निखील काळे यांचा सत्कार करताना पदाधिकारी व कार्यकर्ते.

पाचोड/विजय चिडे : पैठण तालुक्यातील पाचोड येथील निखील काळे हे नुकत्याच झालेल्या पैठण युवक कॉंग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणूकीत भरघोस मते घेवून विजयी झाले आहेत.

कॉंग्रेस पक्षांतर्गत युवक काँग्रेस पैठण तालुकाध्यक्ष पदासाठी निवडणूक घेण्यात आली. ही निवडणूक आँनलाईन निवडणुक पार पडली. यामध्ये तालुक्यातील तीन उमेदवार निवडणुकीसाठी रिंगणात होते. यामध्ये तालुक्यातील १८ ते ३५ वयोगटातील ४ हजार ९३२ युवकांनी या निवडणुकीत मतदान केले. यामध्ये पाचोड येथील युवक निखील काळे हे तब्बल २ हजार १९७ मते घेवुन ते निवडुन आले.

या विजयाबद्दल काळे यांचा डॉ.कल्याण काळे, रविंद्र काळे, अनिल पटेल, विनोद तांबे, हस्नोदीन कटीयारे, निमेश पटेल, बाबासाहेब पवार, मोहीत जाधव यांच्यासह आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या