ईपीएस ९५ पेन्शन धारकांचे १० मार्चला अहमदनगर भविष्य निधी कार्यालयावर धरणे आंदोलन

श्रीरामपूर/ बाबासाहेब चेडे - ईपीएफ ९५ ( Eps 95 ) पेन्शन धारकांचे न्याय मागण्या तातडीने मंजूर व्हाव्यात म्हणून गुरुवार दिनांक १० मार्च रोजी सावेडी, अहमदनगर येथील भविष्य निधी कार्यालयासमोर  सकाळी 11 ते 01 वाजेपर्यंत धरणें आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती पश्चिम क्षेत्र संघटक सुभाष पोखरकर यांनी रविवारी श्रीरामपूर काँग्रेस भवन येथील पेन्शन धारक मेळाव्यात दिली.

ईपीएस 95( EPS 95 ) राष्ट्रीय संघर्ष समिती ही देशातील 71 लाख EPS95 पेन्शन धारकांच्या न्याय हक्कासाठी कार्यरत आहे. संघटनेने देशातील 27 राज्यात आजपर्यंत सर्व प्रकारची आंदोलने केलीत. संबधित सर्व मंत्री तसेच CBT सदस्य यांच्या अनेक वेळा भेटी घेतल्या. दि. 04 मार्च 2020 आणि दि. 05 ऑगस्ट 2021 रोजी दोन वेळा पंतप्रधानांनी संघटनेच्या शिष्टमंडळास प्रत्यक्ष भेटीसाठी वेळ दिला व आश्वाशीत केले की  "EPS-95 निवृत्ती वेतनधारकांना महागाई निर्देशकांसह किमान निवृत्ती वेतन रु. 7500/- मंजूर करण्यासाठी सकारात्मक कार्यवाही केली जाईल. त्याप्रमाणे पंतप्रधान यांनी मंत्री, राज्यमंत्री, पीएमओ, जितेंद्र सिंहजी यांना उद्देश साध्य करण्यासाठी आणि पेन्शन धारकांना सन्मानाने जीवन जगता येईल अशा निर्णयापर्यंत पोहोचण्याचे निर्देश दिले होते. त्याचाच एक भाग म्हणून दिनांक 08 फेब्रुवारी 2022 रोजी वित्त सचिव, भारत सरकार आणि नीलम शमी राव, CPFC, EPFO ​​ व संघटना प्रतिनिधी यांचे मध्ये त्रिपक्षीय चर्चा झाली. मात्र अजूनही सदर प्रश्न प्रलंबीतच आहे. सदर eps पेंशन धारकांना न्याय मिळवून देण्यासाठी भविष्य निर्वाह निधी संगठन चे केंद्रीय विश्वस्त मंडळ हा पाया आहे आणि त्यांनी मनावर घेतल्यास किमान पेन्शन वाढवण्याच्या निर्णयावर पोहोचता येते.

दि.11 मार्च 2022 आणि दिनांक 12 मार्च 2022 रोजी होणारी गुहाटी ( आसाम ) येथील नियोजित बैठक ही पेन्शन धारकांच्या समस्या कमी करण्यासाठी आणि किमान पेन्शन वाढवण्याची सुवर्ण संधी आहे. राष्ट्रीय संघर्ष समितीला उच्च दर्जाच्या C.B.T कडून निश्चित आशा आणि अपेक्षा आहेत. किमान पेन्शन रु. 1000/- वरून रु. 7500/- पर्यंत वाढवण्यास मान्यता देणे  आणि उच्च निवृत्ती वेतनाचा पर्याय खुला करणे ही बाब CBT च्या कक्षेतील आहे आणि ही मागणी epfo कडील फंडाकडून कशी पूर्ण करता येणे शक्य आहे याचे सविस्तर विमोचन संबधित अधिकाऱ्यांचे दिनांक 08 फेब्रुवारीच्या बैठकीत करण्यात आले आहे.

संघटनेच्या महाराष्ट्रातील मुख्यालयी बुलढाणा येथे जेष्ठ वृद्ध पेन्शनधारक ऊन, वारा, पाऊस याची पर्वा न करता 1165 दिवसांपासून त्यांचे न्याय मागण्यासाठी साखळी उपोषण करीत आहेत. मात्र ईतक्या दिवसात CBT चे अध्यक्ष किंवा कोणत्याही सदस्याने या वृद्ध  EPS पेन्शनधारकांना उपोषणापासून परावृत्त करण्यासाठी भेट दिली नाही किंवा दखल घेतली नाही ही दुर्दैवाची बाब आहे.
देशातील EPS95 पेन्शन धारकांना सध्या सरासरी रु 1170/- पेन्शन मिळत आहे आणि एवढ्या रकमेत आजच्या महागाई काळात खरोखरच जीवन जगता येते का? आणि दर महिन्याला पेन्शन वाढीच्या आशेतच जग सोडून जाणाऱ्या पेन्शनधारकांची गेल्या 4 वर्षातील सरासरी ही वार्षिक 60 हजार पर्यंत आहे म्हणजेच दरमहा सरासरी 5000 पेन्शन धारक मृत्यु पावत आहेत. त्यामुळे तातडीने रु 7500/- पेन्शन व त्यावर महागाई भत्ता तसेच वैद्यकीय सुविधा मंजूर करण्यात याव्यात. या मागण्यासाठी हे धरणे आंदोलन आयोजित केले आहे. सदर आंदोलन EPS95 राष्ट्रीय संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांचे नेतृत्वात करण्यात येणार आहे. अशी माहित रविवारी श्रीरामपूर येथे ईपीएस ९५ पेन्शनर वेल्फेअर असोसिएशनच्या मिटींग मध्ये पश्चिम भारत संघटक सुभाषराव पोखरकर यांनी दिली.

तरी अहमदनगर जिल्ह्यातील सर्व eps पेन्शन धारकांनी या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष संपतराव समिंदर, महिला आघाडी अध्यक्षा श्रीमती आशाताई शिंदे, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष नारायण होन, बापूराव बहिरट, सुकदेव पाटील, शिवाजीराव बंगाल, हौसराज राजळे, भगवंतराव वाळके, एक.के औटी, डॉ.रारुत, संजय मुनोत, गायके, भिमराज भिसे आदी पदाधिकारी यांनी केले आहे. आज श्रीरामपूर येथे झालेल्या बैठकीत एस.के.सय्यद यांची जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. सभेस सुभाषराव पोखरकर, नारायणराव होन, संपत समिंदर, राधाकृष्ण धुमाळ, विनायक लोळगे आदी पदाधिकारी यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी श्रीरामपूर तालुकाध्यक्ष राधाकृष्ण धुमाळ होते. या सभेसाठी मोठ्या प्रमाणावर पेन्शन धारक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या