देवळाली प्रवरा / राजेंद्र उंडे : राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक होणार येथील विशेष ग्रामसभेत एकमुखाने निर्णय घेण्यात आला. परंतू यावेळी त्या महिलेने शिवाजी महाराजांचे स्मारका बरोबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आण्णाभाऊ साठे, महात्मा ज्योतीबा फुले यांचे देखील स्मारक व्हावे असा मुद्दा मांडल्याचा राग आल्याने रविंद्र बापुराव मोरे यांच्यासह पाच जणांनी त्या महिलेच्या अंगावर येवुन गचांडी धरुन शिवीगाळ करुण पदर ओढुन लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्यामुळे ग्रामसभेच्या विषयावरुन विनयभंगाचा गुन्हा राहुरी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
बुधवार दि.2 मार्च रोजी टाकळीमिया गावात शिवस्मारक उभारण्यासाठी येथील महादेव मंदिरासमोर ग्रामपंचायतीने विशेष ग्रामसभा आयोजित केली होती. या सभेचे अध्यक्ष सरपंच विश्वनाथ निकम होते. गावात भव्य असे शिवस्मारक व्हावे अशी अनेक शिवप्रेमींची तसेच ग्रामस्थांची मागणी होती. त्यानुसार शिवजयंतीच्या दिवशी शिवशंकर करपे यांनी हा विषय गावासमोर मांडला होता. त्याअनुषंगाने काल विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी शिवशंकर करपे यांनी गावाला येणाऱ्या विकास निधीतून यासाठी काही तरतुद होऊ शकते का? अशी विचारणा केली. त्यावेळी ग्रामविकास अधिकारी के सी भिंगारदे म्हणाले की, गावासाठी येणाऱ्या 15 व्या वित्त आयोगातील येणाऱ्या निधी वापराचा आराखडा तयार झालेला आहे. त्यातुन स्मारकासाठी निधी खर्च करता येणार नाही. ग्रामपंचायतमध्ये सुरू असलेले वाचनालय अनेक वर्षांपासून बंद आहे. ते परत नव्याने सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी नवीन होणाऱ्या वाचनालयास डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यात यावे अशी मागणी शिवशंकर करपे यांनी केली. त्यास सभेने टाळ्यांच्या गजरात मान्यता दिली. शिवस्मारक व्हावे असे सर्वांना वाटते मात्र स्मारक झाल्यानंतर त्याचे निकष, त्याचे पावित्र्य, याची जबाबदारी कशी पेलणार याचाही विचार केला पाहिजे आणि हे आपणाकडून होणार नसेल तर स्मारक केले नाही तरी चालेल असे मत नंदकुमार जुंदरे यांनी मांडले. शिवाजी महाराज व डाॅ बाबासाहेब आंबेडकरांचे विचार कायम जनतेसमोर राहीले पाहिजे आता शिवाजी महाराजांचे स्मारक व वाचनालयाला डाॅ. आंबेडकरांचे नाव यामुळे नवीन तरूण पिढीला त्यांचा आदर्श व विचार नक्कीच प्रेरणा देत राहतील असे केशवराव शिंदे यांनी त्यांचे मत व्यक्त केले.
गावाला येणाऱ्या विकास निधीतून या स्मारकासाठी कुठलाही निधी वापरण्यात येणार नाही. हे संपूर्ण स्मारक लोकवर्गणीतून साकारले जाणार आहे. या स्मारकासाठी 21 सदस्यांची कमेटी स्थापन करण्यात आली. स्मारकासाठी बोलावलेल्या या सभेत अनेकांनी आपले विचार मांडले. या दरम्यान त्या महिलेने सभेत बोलताना सांगितले की डाॅ. बाबासाहेब आंबेडकर हे सुद्धा महान आहेत त्यांचे स्मारक आगोदर झाले पाहिजे ते होणार नसेल तर शिवाजी महाराजांचे स्मारक होऊ नये असे मत व्यक्त केले. त्यास त्या महिले सोबत आलेल्या युवकाने आंबेडकरांचे स्मारक झालेच पाहिजे अशा घोषणा दिल्याने सभेचे वातावरण तापले व मोठा गदारोळ झाला त्यानंतर ग्रामस्थांनी त्या युवकास व त्या महिलेला गर्दीतून बाहेर काढले.
या सभेसाठी उपसरपंच सुभाष जुंदरे, सुभाष करपे, डाॅ.तनपुरे कारखान्याचे माजी उपाध्यक्ष तथा मियासाहेब पतसंस्थेचे अध्यक्ष शामराव निमसे, दैवत पतसंस्थेचे अध्यक्ष केशवराव शिंदे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रविंद्र मोरे, मार्केट कमेटीचे सदस्य दत्ता कवाणे, ज्ञानदेव निमसे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा चिटणीस सुरेश निमसे, वैभव पतसंस्थेचे अध्यक्ष सुरेश भा. करपे, आरपीआयचे बाळासाहेब जाधव, शिवसेनेचे सुभाष चोथे, राहुल चोथे, बाळासाहेब शिंदे, सुनिल शिंदे, अरूण शिंदे, साहेबराव निमसे, राजेंद्र करपे, गुलाब निमसे, योगेश करपे, प्रताप जाधव, शिरीष निमसे, गिरीश निमसे, अँड सुरेश तोडमल, शफिक शेख, अमिर शेख, सिद्धार्थ सगळगिळे, भागवत नवाळे, जिजाबा चिंधे यांचे सह सर्व धर्मांचे तरूण व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान त्या महिलेने शिवाजी महाराजांचे स्मारक व्हावे यास आमची देखील संमती असुन त्यासोबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आण्णाभाऊ साठे, महात्मा ज्योतीबा फुले यांचे देखील स्मारक व्हावे असा मुद्दा मांडल्याने त्याचा राग रविंद्र बापुराव मोरे यास आल्याने त्यानी त्या महिलेच्या अंगावर धावून येवुन गचांडी धरुन शिवीगाळ करणेस सुरवात केली. त्यावेळी पदर ओढुन लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. याच दरम्यान सचिन भाउसाहेब कर्पे याने उर्मट भाषा वापरून डोक्यात चापट मारली. सुरेश ज्ञानदेव तोडमल याने त्यांच्या पाठीत चापट मारली. उमेश रावसाहेब कवाने, बाळासाहेब शिंदे सर्व रा. टाकळीमिया, राहुरी यांनी हात धरून ओढुन शिवीगाळ करून लाथाबुक्कयाने मारहाण करुन आमचे नादी लागली तर तुझा काटा काढु अशी धमकी दिली वगैरे दिली. त्या महिलेने दुपारी राहुरी पोलिस ठाण्यात रविंद्र बापुराव मोरे, सचिन भाउसाहेब कर्पे, सुरेश ज्ञानदेव तोडमल, उमेश रावसाहेब कवाने, बाळासाहेब शिंदे यांच्या विरोधात त्या महिलेच्या फिर्यादी वरुन गुन्हा रजि. नं. 171/2022 भा.द.वि कलम 354, 143, 146, 147, 427, 323, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. ग्रामसभेच्या बाचाबाचीचे रुपांतर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्याने ग्रामिण भागात खळबळ उडाली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक निरज बोकील हे करीत आहे.
गुन्हा मागे घेण्यासाठी राहुरी पोलिस ठाण्यावर मोर्चाटाकळीमियाँ येथिल ग्रामसभेत शिवस्मारका वरुन त्या महिलेने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रविंद्र मोरे यांच्यासह पाच जणाविरोधात विनयभंगासह विविध कलमासह दाखल झालेला गुन्हा मागे घेण्यासाठी टाकळीमियाँ ग्रामस्थांनी गुरुवारी राहुरी पोलिस ठाण्यावर मोर्चा काढण्याचे जाहिर केले आहे.
0 टिप्पण्या