स्वावलंबी-सुसंस्कारी बनवते तेच खरे शिक्षण- मुख्याध्यापक शिरीष मोरे


◾स.भु.प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्याना निरोप, छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिन व सावित्रीबाई पुण्यतिथी साजरी

पैठण/विलास लाटे : तालुक्यातील बालानगर येथील सरस्वती भुवन प्रशालेत छत्रपती संभाजी महाराज आत्म बलिदान दिन, सावित्रीबाई फुले पुण्यतिथी व प्रशालेतर्फे दहावीतील विद्यार्थ्यांना शुभेच्छा-निरोप समारंभ प्रसंगी अध्यक्षीय समारोपात मुख्याध्यापक शिरीष मोरे यांनी "स्वावलंबी व सुसंस्कारी बनवते तेच खरे शिक्षण" असे प्रेरणादायी विधान केले.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष शिरीष मोरे, प्रमुख पाहुणे शिक्षक-पालक संघ उपाध्यक्ष भास्कर गोर्डे, बद्रीनाथ गोर्डे, दत्ता चौधरी, दहावीचे वर्गशिक्षक व संस्कार याग, प्रसिद्धी विभाग प्रमुख पद्माकर वाघरूळकर, विशाल साबळे, नववीचे वर्गशिक्षक सुमेघा साळवे, फेरोज पटेल, वैशाली कुंभकर्ण, नलिनी आमते, सीमा लखमल, राजू शिंदे, वरिष्ठ लिपीक सत्यनारायण तिवारी या मान्यवरांच्या हस्ते सरस्वती व सावित्रीबाई फुले, छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करण्यात आले. यावेळी दहावीतील वर्गप्रतिनिधी अजिंक्य संत, अंकिता भालेकर, ओंकार लासुरे, गायत्री तांबे, संभाजी गोर्डे, दीपक तांबे, विद्यार्थी संसदेचे क्रीडा प्रतिनिधी अथर्व गोर्डे, विद्यार्थिनी प्रतिनिधी सानिया अफसर शेख यांच्या हस्ते मुख्याध्यापकांना वायरलेस साऊंड सिस्टीम ही भेटवस्तू देण्यात आली. काजल मैंद, सानिया शेख, ओंकार लासुरे, संभाजी गोर्डे यांनी प्रशालेतील आठवणींना उजाळा देऊन शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. दहावी वर्गशिक्षक पद्माकर वाघरूळकर यांनी स्वरचित निरोपाची कविता गायली संभाजी महाराज व सावित्रीबाई फुले यांच्या कार्यकर्तृत्वाची माहिती दिली. विशाल साबळे यांनी "कोशिश करने वालों की हार नहीं होती" कविता गाऊन मार्गदर्शन केले. 

प्रमुख पाहुणे भास्कर गोर्डे यांनी उत्कृष्ट नियोजनाबद्दल नववीच्या व प्रशालेला भेटवस्तू दिल्याबद्दल दहावीच्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले. नलिनी आमते, प्रभारी पर्यवेक्षक राजेंद्र गायकवाड यांनी समयोचित मार्गदर्शन केले.अध्यक्षीय समारोप शिरीष मोरे यांनी केला. कार्यक्रमाचे प्रास्तविक वैशाली कुंभकर्ण, सूत्रसंचालन किरण गोर्डे, भक्ती तांबे,आभारप्रदर्शन नम्रता नलावडे, वैष्णवी पाचोडे यांनी केले. फेरोज पटेल व युवराज चित्ते चित्ताकर्षक फलकलेखन व छायाचित्रण केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नववी- दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांनी व प्रशालेतील सर्व कर्मचाऱ्यांनी कठोर परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या