अहमदनगर/ जावेद शेख : समाजाला दिशा देणा-या ग्रंथालये व ग्रंथालयीन कर्मचा-याच्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी सरकार उदासीन आहे, असे प्रतिपादन 'ग्रंथालय मित्र मंडळा'चे संचालक संभाजी पवार यांनी केले.
महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाच्या वतीने आझाद मैदान मुंबई येथे दिनांक २१ मार्च २०१२ रोजी विविध मागण्यांसाठी १ दिवसीय राज्यव्यापी धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये थकित अनुदान, तिप्पट अनुदान वाढ, ग्रंथालयाचा दर्जाबदल, ग्रंथालय कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी लागू करावी, अशा विविध मागण्यां करण्यात आल्या. ग्रंथलय सेवक, ग्रंथालय पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राज्य शासनाकडे वारंवार व समक्ष भेटून, विनंती करूनही ग्रंथालय कर्मचा ऱ्यांच्या मागण्या सुटत नसल्यामुळे आंदोलन करण्याची वेळ आली आहे. प्रशासन व राजकीय पदाधिकारी यांचे ग्रंथालय चळवळी कडे लक्ष नसल्यामुळे ग्रंथालय कर्मचाऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे, असे ठाम मत अध्यक्ष डाॅ.गजानन कोठेवार यांनी मांडले.
महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे सार्वजनिक ग्रंथालयाच्या विविध मागण्यासाठी आझाद मैदानवरील धरणे आंदोलनात अहमदनगर जिल्ह्यातील ग्रंथालय मित्रमंडळाचे संभाजी पवार, दादा शिरसाठ, अमोल इथापे, सुरेश हरेल आदि सहभागी झाले होते.
आझाद मैदान येथे महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाच्या आंदोलनाविषयी बोलताना संभाजी पवार म्हणाले की वर्ष २०१२ पासून नवीन मान्यता दिली नसून अस्तित्वात असलेल्या ग्रंथालयाची अवस्था बिकट आहे. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण खाते नेमके काय करत आहे? असा सवाल करत माहीती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली म्हणाले की विशिष्ट असे मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाला ५ कोटींचे अनुदान दिले जाते आणि ग्रामीण भागातील ग्रंथालयाकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. ग्रंथालय सेवकांचे अनंत प्रश्न आहे त्याकडे तत्काळ लक्ष देणे गरजेचे आहे. अनिल गलगली पुढे म्हणाले की, शिक्षण क्षेत्रातही ग्रंथालय आहेत पण ग्रंथपालच नाही अशी दारुण परिस्थिती आहे. वाचन संस्कृतीच्या बाता करणारे शासन ते काम प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वा-यांवर सोडत आहे, ही चिंताजनक बाब आहे.
यावेळी डॉ गजानन कोटेवार, संभाजी पवार, डॉ दत्ता परदेशी, अँड. प्रवीण पाटील, सुनील कुबल, अनिल सोनावणे, डॉ राजशेखर बालेकर, सुरेश हरेल, दादा शिरसाठ, अमोल इथापे आदी उपस्थित होते.
0 टिप्पण्या