देवळाली प्रवरा/ राजेंद्र उंडे : अहमदनगर जिल्ह्यात मालमत्ता विषयक गुन्ह्याकरिता कुख्यात असलेल्या सागर भांड टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा ( मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात आली होती.
राहुरी पोलीस स्टेशन येथे फिर्यादी मयूर दिलीप देवकर यांनी गुन्हा दाखल केला होता, सदर गुन्हा कुख्यात सागर भांड टोळीने केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर सागर भांड सह टोळीतील अन्य पाच सदस्यांना अटक करण्यात आली होती. सागर भांड टोळी ही कोणताही कामधंदा न करता संघटीत पणे बेकायदेशररित्या स्वतःच्या आर्थिक फायद्या करिता हिंसाचाराचा वापर करून, हिंसाचार करण्याची धमकी देऊन तसेच धाक दपटशहा दाखवून जबरदस्तीने जबरी चोरी, दरोडा टाकून दहशत करीत होती.
या गुन्ह्यातील विशेष बाब म्हणजे टोळीप्रमुख सागर भांड चे वडील पुणे पोलीस दलामध्ये कार्यरत होते. तरी देखील सदरक्षणाय खलनिग्रहणाय या उक्तीप्रमाणे गुन्हेगारास कुठल्याही प्रकारची सहानुभूती न दाखवता जास्तीत जास्त कठोर कारवाई करण्याचा प्रयत्न अहमदनगर पोलीस यांचेकडून करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याची गांभीर्याने दखल घेऊन मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक यांना सादर केला होता. सदर प्रस्तावास त्यांनी मंजुरी दिली असून तपास पोलिस उपअधिक्षक संदीप मिटके यांच्या कडे वर्ग करण्यात आला होता. सागर भांड विरुद्ध दरोडा, अपहरण, फसवणूक, अवैध शस्त्र वापर असे तब्बल 27 गंभीर गुन्हे दाखल आहेत.
या गुन्ह्याचा तपास करत असताना हा गुन्हा फौजदारी कट रचून करण्यात आल्याचे निष्पन्न झाल्याने व गुन्हा करून पुरावे नष्ट केला म्हणून भा.द.वि. 201 कलमाप्रमाणे तपासी अधिकारी यांचेकडून या गुन्ह्यास वाढीव कलमे लावण्यात आली. सागर भांड टोळीवर या पूर्वी संघटितपणे केलेले खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत. सागर भांड (टोळी प्रमुख) राहुरी पोलिस ठाण्यात आठ गुन्हे दाखल आहेत. 711/21, 690/21, 686/21, 652/21, 282/16, 873/19, 330/19, 952/19,नगर एम आय डी सी पोलिस ठाण्यात अकरा गुन्हे 12/16 52/14, 181/14, 247/14, 29/15, 32/15, 242/15, 28/16, 237/17, 272/18, 425/18, शिर्डी 165/17, कोतवाली पोलिस ठाण्यात दोन गुन्हे 461/17, 12/17, भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात एक गुन्हा 191/18, शिक्रापूर जि. पुणे पोलिस ठाण्यात एक गुन्हा 86/19, संगमनेर शहर पोलिस ठाण्यात एक गुन्हा 121/15 सुपा पोलिस ठाण्यात एक गुन्हा 28/17 वरील प्रमाणे 27 गुन्हे दाखल आहेत.
सागर टोळीचा सदस्य असलेला निलेश संजय शिंदे याच्यावर राहुरी पोलिस ठाण्यात पाच गुन्हे दाखल आहेत. 711/21, 690/21, 686/21, 652/21, 632/21, तोफखाना पोलिस ठाण्यात एक 26/21, नगर एम आय.डी सी.पोलिस ठाण्यात एक 12/21, गणेश रोहिदास माळी याच्यावर राहुरी पोलिस ठाण्यात पाच गुन्हे 711/21,690/ 21, 686/21, 652/21, 632/21 रमेश संजय शिंदे राहुरी पोलिस ठाण्यात चार गुन्हे दाखल आहेत 711/21, 690/21, 686/21, 632/21 नितीन उर्फ सोन्या मच्छिंद्र माळी याच्यावर राहुरी पोलिस ठाण्यात पाच गुन्हे दाखल आहेत. 711/21, 690/21, 686/21, 652/21, 632/21 रवी पोपट लोंढे याच्यावर राहुरी पोलिस ठाण्यास दोन गुन्हे 711/21, 690/21, नगर एम आय. डी सी. पोलिस ठाण्यात एक गुन्हा दाखल 29/21 वरील प्रणाणे विविध गुन्हे दाखल आहेत.
कुख्यात गुन्हेगार सागर भांड टोळी विरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999चे कलम 3(1) (ii), 3(2), व 3(4)(मोक्का) अन्वये अपर पोलीस महासंचालक यांच्या आदेशा नुसार न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्याची परवानगी मिळाली होती. पोलिस उपअधिक्षक संदीप मिटके यांनी सदर गुन्ह्याचे दोषारोपपत्र विशेष मोका न्यायालयात दाखल केले.
0 टिप्पण्या