राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत वनस्पती रोगशास्त्र व कृषि अणुजीवशास्त्र विभाग, पदव्युत्तर महाविद्यालया तर्फे भारतीय कृषि अनुसंधान परिषद अनुदानांतर्गत अनुसूचित जाती (SC-SP) प्रवर्गासाठी अळिंबी उत्पादन, काढणी पश्चात तंत्रज्ञान व उद्योग व्यवसाय मार्गदर्शन या विषयावर एक दिवसीय प्रशिक्षण वर्ग आयोजित केला होता.
या प्रशिक्षण वर्गामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून 20 प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते. त्यामध्ये 11 महिला व 09 पुरुषांनी सहभाग नोंदविला होता. या प्रशिक्षणामध्ये वनस्पती रोगशास्त्र व कुषि अणुजीवशास्त्र विभाग प्रमुख डॉ. तानाजी नरुटे, कृषि महाविद्यालय, पुणे येथील अ.भा.स. अळिंबी सुधार प्रकल्पाचे कवक शास्त्रज्ञ डॉ. बाबुराव चिरमे व डॉ. अशोक जाधव यांनी अळिंबी उत्पादन, काढणी पश्चात तंत्रज्ञान व उद्योग व्यवसाय या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षणार्थींना विद्यापीठाची कृषिदर्शनी, अळिंबी स्पॉन व घडीपत्रिका यांचे वाटप करण्यात आले.
महात्मा फुले कुषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील, संशोधन संचालक डॉ. शरद गडाख, अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. तानाजी नरुटे यांनी कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन करुन कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न केला.
0 टिप्पण्या