राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषि विद्यापीठातील पदव्युत्तर महाविद्यालयांतर्गत जागतिक महिला दिनानिमित्त मॉसाहेब जिजाऊ बोलते हा एकपात्री प्रयोग श्रीमती शुभांगी शिंदे यांनी सादर केला.
याप्रसंगी विद्यापीठाचे अधिष्ठाता (कृषि) डॉ. प्रमोद रसाळ, संचालक संशोधन व विस्तार शिक्षण डॉ. शरद गडाख, नियंत्रक सुखदेव बलमे, आंतरविद्या जलसिंचन शाखा विभाग प्रमुख डॉ. महानंद माने, सौ. वैशाली पाटील यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलन करुन व महात्मा जोतीबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करुन झाली. डॉ. प्रमोद रसाळ यांनी श्रीमती शुभांगी शिंदे यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.
श्रीमती शुभांगी शिंदे यांनी मॉसाहेब जिजाऊ यांचा जीवनपट त्यांच्या अभिनयातून श्रोत्यांसमोर सादर केला. त्यांच्या एकपात्री अभिनयातून मॉसाहेब जीजाऊ यांचे सदगुण, शौर्य, दुरदृष्टीकोन, निर्णय क्षमता, अष्टपैलू व्यक्तीमत्व आणि कर्तृत्व या गुणांचा जीवनपट सादर केला. या प्रयोगातून त्यांनी जिजाऊंचे जन्मापासून ते शिवाजी महाराजांच्या संगोपणापर्यंत प्रत्यक घटना अभिनयातून श्रोत्यांसमोर जीवंत केली.
एखाद्या स्त्रीने आपल्या जीवनात खंबीरपणे उभे राहून यशस्वी होण्याचा मुलमंत्र त्यांनी या जीवनपटातून दिला. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीमध्ये सौ. पुष्पा बलमे, सौ. विदुला माने व प्रा. जितेंद्र मेटकर तसेच पदव्युत्तर महाविद्यालयाचे विद्यार्थी, सावित्रीबाई फुले विद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपकुलमंत्री डॉ. रीतू ठाकरे, वसतीगृह व्यवस्थापक गणेश मेहेत्रे, सौ. कविता काकडे, कैलास पावबाके यांनी परिश्रम घेतले.
0 टिप्पण्या