राहुरी / बाळकृष्ण भोसले - गुरूवार १६ मार्च रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस हेमंत ओगले यांनी अचानक कोल्हार खुर्दला भेट दिली या निमित्ताने कोल्हार खुर्द काँग्रेस कमेटीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
प्रसंगी बोलताना ते म्हणाले म्हणाले अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे डिजिटल सभासद नोंदणी अभियान सुरू आहे. त्यात काँग्रेस पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त सभासद नोंदणी करावी व काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्य गोरगरीब जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करावे. त्यासाठी मी निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या मागे सदैव तत्पर राहणार आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सुरेश पाटील शिरसाठ, उपाध्यक्ष रखमाजी क्षीरसागर, अनिल पाटील शिरसाठ, नानाभाऊ शिरसाठ, रमेश शिरसाठ, आल्फोन्स भोसले, शिरीष भोसले, गोरक्ष अनाप, सचिन शिंदे, प्रकाश चिखले, भागवत शिरसाठ, राहुरी तालुका काँग्रेसचे सरचिटणीस संजय भोसले आदी काँग्रेस पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
0 टिप्पण्या