संगमनेर शहर : अकोले तालुक्यातील प्रवरा विभागातील राजकीय सामाजिक दृष्ट्या जागृत समजल्या जाणाऱ्या इंदोरी येथील स्मशान भूमी परिसरात स्थानिक विकास निधीतून तसेच पंचायत समिती सेस मधून स्वच्छतागृहाचे काम मंजूर करुन कामाचे उद्घाटन आज करण्यात आले. गावाच्या दृष्टीने गावातील आपली मंदिरे आपल्या दृष्टीने जितकी महत्त्वाची आहेत तितकीच गावातील दशक्रिया विधी / स्मशान भूमी हे ठिकाणे महत्त्वाची आहेत. गावच्या विकासाबरोबर या परिसराचा देखील विकास झाला पाहिजे, त्या ठिकाणी सर्व सोयी सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे, ही काळाची गरज असून त्या परिसराच्या विकासासाठी कटिबद्ध राहणार असल्याचे मत माजी उपसभापती मारुती मेंगाळ यांनी उद्घाटन प्रसंगी बोलतांना व्यक्त केले.
गावातील प्रत्येक दशक्रिया विधी तसेच स्मशान भूमी ही ठिकाणे मानवतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ठिकाणे आहेत. त्या परिसरात दशक्रिया विधी /वर्ष श्राद्ध/ अंत्य विधी/या सहित अनेक धार्मिक कार्यक्रम होत असतात. किमान या कार्यक्रमांना नागरिक 3 तास थांबून राहतात. त्या परिसरात स्वच्छतागृह असणे ही नागरिकांची गरज आहे. रस्ते, पाणी, गटार, सभागृह या सहित आदी सार्वजनिक प्रश्न जसे प्राधान्याने आपण मार्गी लावतो तसेच या स्मशान भूमी परिसरात देखील या प्रश्नांना महत्त्व देऊन ही विकास कामे केली पाहिजे ही काळाची गरज आहे. त्या अनुषंगाने इंदोरी येथील स्मशान भूमी परिसरात स्वच्छतागृहाचा प्रश्न मार्गी लावला असून भविष्य काळात गावच्या विकासाबरोबर गावातील स्मशान भूमी परिसराच्या विकासासाठी कटिबद्ध राहणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
या उद्घाटन प्रसंगी सरपंच वैभव नवले, निखिल नवले, नरेंद्र नवले, अक्षय देशमुख, दिलिप नवले, ह भ प जोशी महाराज, सुभाष येवले, संदीप नवले, रामनाथ नवले, डॉ सतीश चासकर, विकास बंगाळ, बाळासाहेब मालुंजकर, रवी मालुंजकर, सुमित मालुंजकर, नाथा भोर, शिवाजी जाधव, विराज देशमुख, अरुण आरोटे, रामचंद्र हासे, तुषार नवले, रवी देशमुख, कैलास देशमुख, प्रविण नवले, अशोक कडलग यासहित कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

0 टिप्पण्या