गुरुकुल मंडळाच्या वतीने नारी शक्तीचा सन्मान

श्रीरामपूर [ बाबासाहेब चेडे ] : जागतिक महिला दिनानिमित सन्मान नारीशक्तीचा कार्यक्रम गुरुकुल मंडळ, शिक्षक समिती व महिला आघाडी यांच्या वतीने सेंट झेवियर ज्युनियर कॉलेज श्रीरामपूर येथे पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी श्रीरामपूर तालुका पंचायत समिती सभापती डॉ वंदनाताई मुरकुटे ह्या होत्या तर साईबाबा संस्थान शिर्डी विश्वस्त अनुराधाताई आदिक ह्या प्रमुख अतिथी होत्या. डॉ वंदनाताई मुरकुटे यांनी यावेळी सांगितले की प्रथम महिलांनी स्वत:कडे लक्ष देण्याची अत्यंत गरज आहे. सर्व महिलांनी सक्षम झाले पाहिजे व महिलांनीच महिलांचा सन्मान ठेवला पाहिजे तरच इतर आपला आदर करतील. तसेच गुरुकुल मंडळाने सर्वच क्षेत्रातील महिलांचा सन्मान केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले.

याप्रसंगी अनुराधाताई आदिक म्हणाल्या की महिलांनी आपल्या हक्कावर गदा येत असेल तर त्यासाठी निश्चितच लढावे व प्रत्येक मुलीने शिक्षण घेऊन उच्च पदावर जाण्याचे स्वप्न बाळगावे. यावेळी उत्कृष्ट कार्याबद्दल सर्व महिलांचा भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. प्रास्तविक गुरुकुल मंडळाचे अध्यक्ष संजय वाघ यांनी केले. डॉ जया कुकरेजा, परिवहन अधिकारी रोशनी डांगे, गट शिक्षणाधिकारी साईलता सामलेटी, राष्ट्रसह्याद्री उपसंपादक पूनम नवले, सिस्टर जाक्लीन, माधवी पलघडमल, प्रज्ञा माटे, रोहिणी उंडे, अंजली शिंदे, मंगल वाघ, लता औटी, अवंती बोरसे, कोमल पोळ व इतर सर्व क्षेत्रातील काही महिलांनी जागतिक महिला दिनाचे महत्व या विषयी मनोगत व्यक्त केले.
यावेळी कल्पना बाविस्कर, मीना निकम, सुनिता तुरे, खान रुबिना, शोभा गायकवाड, कचेश्वर जठार, बाळासाहेब काशीद, भांगरे, प्रदीप दळवी, एकनाथ रहाटे, अनिल ओहोळ, प्रल्हाद साळुंके, इमाम सय्यद, किरण घोडके, राज गायके, डॉ कुकरेजा आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन रवी वाघ, सुनील बागुल यांनी केले व आभार आबाजी भांगरे यांनी मानले.

जागतिक महिला दिनानिमित्त पोलीस, तलाठी, ग्रामसेवक, पंचायत समिती कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, परिचारिका, शिक्षिका अशा विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिलांचा सन्मान एकाच व्यासपीठावर करण्याचा आमचा मानस होता. तो आज या तालुक्यात प्रथमच पूर्ण झाला.
_ संजय वाघ,अध्यक्ष गुरुकुल मंडळ

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या