पाचोडच्या महसुल मंडळ अधिकाऱ्यांला शेतकऱ्यांकडून मारहाण


पाचोड/ विजय चिडे : पाचोडच्या मंडळ अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची संचिता परत न दिल्याने संतापलेल्या शेतकऱ्यांने चक्क महसुल मंडळ अधिकाऱ्यांनाच मारहाण केल्याची घटना सोमवारी (दि.१४) रोजी सकाळी साडेबाराच्या दरम्यान घडली असून पाचोड पोलिस ठाण्यात दोघा नवरा बायको विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, महसुल मंडळ अधिकारी जयकुमार भिमराव केकाण हे पाचोड येथे गेले सात महिन्यापासुन महसुल मंडळ विभागाचे मंडळ अधिकारी म्हणुन कामकाज पाहत असुन सोमवारी सकाळी केकाण हे महसुल मंडळ कार्यालयात काम असल्याने आले होते.साडेबाराच्या सुमारास कार्यालयात काम चालू आसताना श्रीमंत नाना आहिरे (रा. पाचोड) हे आले व वडजी सज्जामधिल संचिता द्या असे म्हणाला. त्यावर मंडळाधिकारी उत्तरले की, वडजी सज्जा मधिल संचिते बाबत मला काही माहीती नाही. तेव्हा त्यांने स्वता: आमचे मंडळ अधिकारी कार्यालयात येवून संचीता उचकीत होता. व त्याची संचीता पाहत होता. तेव्हा माझ्याकडे कोतवाल म्हणून काम करीत असलेले रमेश गेनुजी शेळके (रा. पाचोड बु.) यांनी व मी स्वता:हा त्यास सांगितले की संचीता उचकवु नको. तुमचे वडजी सज्जेचे तलाठी आल्यावर घेवून जा असे समजावुन सांगुन तु कार्यालयाचे बाहेर जा असे सांगितल्यावर त्याने काहीएक न ऐकता शिवीगाळ करु लागला. त्यावेळी पाचोड सज्जेचे तलाठी अनुना शोभीवत कावळे, दिपक भास्कर वाघ (रा. केकतजळगाव) संदिप तुळशीदास गायकवाड (रा. सानपवाडी) यांनी समजावुन बाहेर काढले. त्यानंतर तो निघुन गेले. त्यानंतर पंधरा मिनीटाने त्याची पत्नी जयश्री श्रीमंत आहिरे (रा. पाचोड) हिला घेवून आला आणि म्हणाला की, त्या मंडळ अधिकारी केकाण यांना चपलाने मार, मी कार्यालयाचे कामकाज करीत असताना माझे सरकारी कामात अडथळा करुन मला पुन्हा शिवीगाळ करुन गच्ची पकडुन लाथा बुक्याने मारहाण केली असून जिवे मारण्याची धमकी दिली. त्याच बरोबर तु बाहेर ये तुला पाहतो असे म्हणुन धमकी दिली असल्याचे केकाण यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटलं असून श्रीमंत नाना आहिरे व जयश्री श्रीमंत आहिरे यांच्या विरूद्ध पाचोड ठाण्यांत भादवि कलम ३५३, ३२३,५०४,५०६, ३४ नुसार पाचोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस कर्मचारी करीत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या