लोणी - लोकनेते डॉ बाळासाहेब विखे पाटील पद्मभूषण उपाधीने सन्मानित प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी कु.मेघना गुरव हीची पदव्युत्तर शिक्षणासाठी जर्मनी येथे निवड झाली असल्याचे माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य ऋषिकेश औताडे यांनी दिली.
याबाबत सविस्तर माहीती अशी की कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मेघना गुरव हिची अँनहॉल्ट युनिव्हर्सिटी ऑफ अप्लाइड सायन्सेस जर्मनी येथे मॉलेक्यूलर बायोटेक्नॉलॉजी या पदव्युत्तर पदवीसाठी निवड झालेली आहे. महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात नेहमीच विविध उपक्रम राबवत असतात त्यामध्ये व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा, शिवार फेरी, कृषी आधारित. औद्योगिक कंपनी भेटी, कार्यानुभव उपक्रम, शेतकरी मेळावे तसेच परदेशात शिक्षणाच्या संधी या विषयावर मार्गदर्शन आदी उपक्रमाचा समावेश होतो.
सदर विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थचे अध्यक्ष ना.राधाकृष्ण विखे पाटील, जि.प माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील, खा.सुजय विखे पाटील, संस्थचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.शिवानंद हिरेमठ, सहसचिव भारत घोगरे, संचालिका लिलावती सरोदे तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य ऋषिकेश औताडे यांनी अभिनंदन करून भावी वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या.
सदर विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्रा.भाऊसाहेब घोरपडे, प्रा.अमोल सावंत, प्रा.स्वप्नील नलगे, प्रा.प्रविण गायकर, प्रा.महेश चंद्रे,प्रा.विशाल केदारी, प्रा.स्वरांजली गाढे, प्रा,मिनल शेळके यांचे मार्गदर्शन लाभले.
0 टिप्पण्या