पैठण : पैठण तालुक्यातील बिडकीन येथील सरस्वती भुवन प्रशालेत थोर समाजसेविका क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या १२५ व्या पुण्यतिथीनिमित्त प्रशालेचे मुख्याध्यापक मधुकर बिरहारे, उपमुख्याध्यापक राजेंद्र कोठावदे, जेष्ठ शिक्षक प्रफुल्ल कुलकर्णी यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले.
याप्रसंगी श्वेता निकम, प्रांजल आष्टीकर, संध्या गायकवाड, निकीता हिवाळे यांनी क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. प्रशालेचे मुख्याध्यापक यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे कार्य अविस्मरणीय असून सर्व मानवी समाजासाठी प्रेरणादायी व भूषणावह आहे असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र नागरे यांनी तर आभार संतोष शिंदे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रशालेच्या सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
0 टिप्पण्या