विलास लाटे/पैठण : कारकीन, (ता. पैठण) येथे अंगणवाडी सेविका, कर्मचारी यांच्या तर्फे महिला दिनानिमित्त गुरुवारी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात गावातील शालेय विद्यार्थिनींनी विविध कर्तृत्ववान महिलांच्या जीवनकार्यावर भाषणे दिली. विविध गीते सादर केली, यात ग्रामस्थ महिला भावूक झाल्याचे दिसून आले.
कारकीन येथे गुरुवारी महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. यावेळी कार्यक्रम अध्यक्ष गावच्या सरपंच भारती रणजित नवले, प्रमुख अतिथी 'आयसीडीएस'च्या पर्यवेक्षिका श्रीमती तोशीवाल, शुभांगी पाटील, ग्रामविकास अधिकारी संजय साबळे या मान्यवरांची उपस्थिती होती. यासह सर्व ग्रामपंचायत सदस्या तसेच आशा सेविका उपस्थित होत्या. अंगणवाडी कार्यकर्त्या पद्मा नेमाने, पूनम बोर्डे, मंगल वैद्य, कोमल थोटे, मंगल वैद्य, अंजली लिपाने तसेच अंगणवाडी मदतनीस चंद्रकला, गुंजाळ, मंगल जाधव, कमरुबी शेख, शारदा ताकवले लिपाने यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. पूनम बोर्डे यांनी प्रास्ताविक केले. गुरुकिल्ली क्लासेसचे संचालक राजेंद्र राखे यांनी सूत्रसंचालन केले. अंजली लिपाने यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.
शालेय विद्यार्थिनी शिवकन्या लिपाने, गायत्री लिपाने, अमृता लिपाने, आर्शिया शहा, सारिका लिपाने, तेजश्री लिपाने, स्नेहा गुंजाळ, निकिता गुंजाळ, साक्षी मुळे, अक्षरा मुळे, तनुजा लिपाने, धनश्री लिपाने, प्रणिता लिपाने, नेहा गुंजाळ, स्नेहल लिपाने, अदिती लिपाने, वृषाली लिपाने यांनी भाषणे दिली. भक्ती लिपाने व भाग्यश्री नवले व वैष्णवी वाघमारे यांनी गीत सादरीकरण केले. श्वेता लिपाने, प्रणिता लिपाने, भक्ती लिपाने, अक्षरा लिपाने, नेहा गुंजाळ, शीतल मुळे या विद्यार्थिनींनी नृत्य सादर केले. मान्यवर महिलांच्या हस्ते सहभागी मुलींना बक्षीस वितरण करण्यात आले. या प्रसंगी ग्रामस्थ बाबासाहेब बोर्डे, गणेश लिपाने, पांडुरंग लिपाने, शिवाजी लिपाने आदींनी सहकार्य केले.
0 टिप्पण्या