राहुरी न्यायालयात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

राहुरी शहर/ अशोक मंडलिक : राहुरी न्यायालयात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहुरी न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश श्रीमती असावरी वाडकर मॅडम या होत्या तर प्रमुख उपस्थितीत सह.न्यायाधीश सौ. सुजाता शिंदे मॅडम, सह.न्यायाधीश कु. माया मथुरे मॅडम या होत्या.

सदर कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन राहुरी न्यायालयातील महिला वकील व कोर्टातील महिला कर्मचारी स्टॉप यांनी अत्यंत व्यवस्थित केले होते. महिला दिनाविषयी माहिती ॲड. पल्लवी कांबळे, ॲड. जयश्री घावटे यांनी दिली. आपल्या अध्यक्षीय प्रमुख भाषणात न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश यांनी महिला विषयी कायद्याची माहिती दिली. त्याच बरोबरच महिलांच्या न्याय व हक्क अधिकार या विषयी महिलांनी जागृत रहावे व आपल्या कर्तव्याचे पालन करून आपण ज्या क्षेत्रात कार्यरत आहोत त्या क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवला पाहिजे असे बोलून येत्या १२ मार्च २०२२ रोजीच्या लोक अदालत मध्ये जास्तीत जास्त प्रकरण ठेवण्याचे आव्हान केलेे.

या प्रसंगी ॲड. स्वाती सांगळे, ॲड. अनिता तोडमल, ॲड. सविता गांधले, ॲड. मनीषा आढाव, ॲड. अर्चना मैंड, ॲड. कल्याणी पागिरे, ॲड. ज्योती राऊत, ॲड. सुरेखा कुलकर्णी व न्यायालयीन महिला कर्मचारी स्टॉप आदी महिला उपस्थित होत्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या