'प्रहार' ची देवळाली प्रवरा व राहुरी फॅक्टरी शहर महिला कार्यकारिणी जाहीर; कदम व कांबळेंची निवड

राहुरी/ बाळकृष्ण भोसले - प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे यांच्या अध्यक्षतेखाली देवळाली प्रवरा शहरातील समर्थ बाबुराव पाटील महाराज मंदिर सभामंडपामध्ये महिला दिनाचे औचित्य साधून प्रहार जनशक्ती पक्षाच्या महिला आघाडीच्या देवळाली प्रवरा शहराध्यक्षपदी सौ भाग्यश्री सुनील कदम तर राहुरी फॅक्टरी महिला शहर अध्यक्षपदी सौ रजनी प्रभाकर कांबळे यांची निवड करणेत आली. जिल्हाध्यक्ष अभिजीत पोटे यांचे हस्ते देवळाली प्रवरा व राहुरी फॅक्टरी कार्यकारिनी जाहीर करून या महिला पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून देवळाली प्रवरा शहर महिला आघाडीची आज कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. त्यामध्ये शहर महिला अध्यक्ष पदी भाग्यश्री सुनील कदम, तर उपाध्यक्ष म्हणून सुरेखा विस्वास शिंदे व आशा माळी यांची निवड तर राहुरी फॅक्टरी शहर महिला आघाडीमध्ये राहुरी फॅक्टरी शहर आघाडी अध्यक्षपदी रजनी प्रभाकर कांबळे, उपाध्यक्ष पदी वंदना संजय कांबळे, अफसाना सलीम सय्यद तर सचिव पदी लैला असलम शेख यांनी निवड करून त्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

याप्रसंगी प्रहार चे जिल्हा सल्लागार मेजर महादेव आव्हाड, जिल्हा संघटक सरपंच बाळासाहेब खर्जुले, प्रहार सोशल मीडिया जिल्हा प्रमुख संजय वाघ, प्रहार नेवासा तालुका अध्यक्ष जालिंदर आरगडे, श्रीरामपूर विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष आप्पासाहेब ढुस, प्रहार दिव्यांग क्रांती राहुरी तालुका अध्यक्ष मधुकर घाडगे, प्रहार दिव्यांग क्रांती देवळाली शहराध्यक्ष सलीम शेख, विजय कुमावत, अबिद शेख आदींसह शेकडो ग्रामस्थ या कार्यक्रमास उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या