राहुरी / बाळकृष्ण भोसले - पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या तालुक्यातील सात्रळ येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल व आयक्युएसी अंतर्गत विद्यार्थी-विद्यार्थिनीसाठी पुणे येथील टाटा इंटरप्राईजेस लिमिटेड बिग बास्केट या नामांकित कंपनीच्या वतीने सात्रळ महाविद्यालयात कॅम्पस इंटरव्यूचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये २३ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
मुलाखतीमध्ये शेवाळे गणेश राजेंद्र, दिघे संकेत अशोक, खाटेकर प्रशांत सुभाष, बेलकर अनिकेत संजय, हारदे प्रफुल्ल भाऊसाहेब, हारदे प्रशांत भाऊसाहेब, भोसले सौरभ विठ्ठल, हजारे समाधान भाऊसाहेब या आठ विद्यार्थ्यांना नोकरीची संधी मिळाली आहे. कॅम्पस इंटरव्यूसाठी कंपनीचे बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर तुषार ब्राह्मणे, प्रकाश माघाडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मा. मंत्री व विधानसभा सदस्य राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, माजी जि.प. अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, सहसचिव भारत घोगरे यांनी अभिनंदन केले. सदर उपक्रम महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य प्रो. (डॉ.) सोमनाथ घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला. याप्रसंगी प्रवरा प्लेसमेंन्टचे समन्वयक मनोज परजणे, उपप्राचार्य प्रा. दीपक घोलप, प्रा. दिनकर घाणे, डॉ. भाऊसाहेब नवले आदी उपस्थित होते. महाविद्यालय विकास समितीचे सर्व पदाधिकारी यांनी सदर उपक्रमाचे कौतुक केले.
रोजगार मार्गदर्शन मेळावा यशस्वी करण्यासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचे समन्वयक प्रा. वैभव दिघे, प्रा. सुधीर वाघे, प्रा. तुषार कडसकर, प्रा. राहुल कडू, प्रा. स्वाती कडू, प्रा. अश्विनी साळुंखे, प्रा. दीप्ती आगरकर यांनी परिश्रम घेतले.
0 टिप्पण्या