शाहपुर मानेगाव शालेय समितीवर महिला राज


◾अध्यक्षपदी कविता एरंडे तर उपाध्यक्षपदी वैशाली मतकर यांची निवड

पैठण : तालुक्यातील शाहपुर मानेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जागतीक महिला दिनाचे औचित्य साधून शालेय व्यवस्थापन समिती गठीत करुन अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. विशेष म्हणजे या कमिटीत सर्वाधिक महिलांची निवड करुन महिलांना प्राधान्य देण्यात आले. दरम्यान महिला दिना निमित्त महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. 

यावेळी ७४ जळगाव ग्रुप. ग्रा.पंचायतचे माजी सरपंच योगिता संदीप एरंडे, ग्रा.पं.सदस्य शिवगंगा राम मतकर, किशोर एरंडे, राम मतकर, दिलीप एरंडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

यानिवडीमध्ये अध्यक्षपदी कविता सोमनाथ एरंडे, उपाध्यक्षपदी वैशाली सोमनाथ मतकर यांची तर सदस्यपदी सुवर्णा अर्जुन ओहळे, स्वाती सोमनाथ सोलाट, मनिषा जालींदर मतकर, स्वाती सोमनाथ बोडखे, शिक्षणतज्ञ दिलीप एरंडे, शिक्षणप्रेमी अमोल गरड यांची निवड करण्यात आली. महिला दिना निमित्त गठीत समितीत सर्वाधिक महिलांना प्राधान्य देवून खऱ्या अर्थाने महिलांचा सन्मान केल्याचे यानिवडीतून दिसून आले.

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक उध्दव कुकर, सहशिक्षक ज्ञानेश्वर उभेदळ, सुनिल एरंडे, देविदास क्षिरसागर, उध्दव गरड, अर्जुन ओहळे, आशा कार्यकर्त्या संगीता सोलाट, अंगणवाडी सेविका भारती मतकर, मिराबाई काळे, मदतनीस लिलाबाई मतकर आदीसंह गावातील नागरीक उपस्थित होते. या निवडीचे ग्रामस्थांतुन विशेष अभिनंदन केले जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या