कोल्हार खुर्द मध्ये पाणी टंचाईचे संकट; महावितरणने ग्रामपंचायतचा विद्युत पुरवठा केला खंडित

राहुरी शहर/ अशोक मंडलिक : तालुक्यातील कोल्हार खुर्द हे गाव तसे प्रवरा नदीकाठावर सुजलाम सुफलाम आणि शेती प्रधान गाव म्हणून ओळखले जाते‌. मात्र पिण्याच्या पाण्यासाठी येथील ग्रामस्थांची नेहमीच भटकंती असते. उन्हाळ्यात या गावात पाणीटंचाई मोठ्या प्रमाणत जाणवत असते. यंदा मात्र उन्हाळ्याची चाहूल लागण्यापूर्वीच या गावातील ग्रामस्थांना पाणी टंचाईने ग्रासले आहे. गेल्या सहा दिवसापासून गावातील भाऊसाहेब नगर, खंडोबा वस्ती, गावठाण, तसेच पाटीलवाडी रोड परिसरात पिण्याच्या पाण्याचे नळ निर्जळी असल्याचे दिसून आले आहेत. त्याचप्रमाणे यात भर म्हणून ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर पाणी पुरवठ्याचे विद्युत कनेक्शन कट केले आहे.

राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द येथे गेल्या 15 दिवसापासून उन्हाळ्याच्या पाणी टंचाई चे संकट उभे ठाकले. गेल्या आठ दिवसापासून गावठाण हद्द, भोसले नगर, परिसरातील नळ निर्जळी आहे. अशातच ग्रामपंचायत ची पाणी पट्टी देखील ग्रामस्थांकडे मोठ्या प्रमाणत थकीत आहे. ग्रामपंचायत स्तरावरून पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी अनेक प्रयत्न होत आहेत, मात्र तिजोरीत खडखडाट असल्यामुळे ग्रामपंचायत पदाधिकारी देखील पाणी टंचाई चे संकट दूर करण्यासाठी निष्प्रभ ठरत आहेत.

ग्रामपंचायत कडे महावितरणची जवळपास एक कोटी रुपये थकबाकी असल्यामुळे, महावितरण ने देखील कारवाईचा बडगा उगारून गावाच्या पाणी योजनेचा विद्युत प्रवाह खंडित केला आहे. त्यामुळे काही प्रमाणात पाणी शिल्लक असताना देखील गावातील नळांना ग्रामपंचायत पाणी पुरवठा करू शकत नाही. त्यातच गावातील अनेक मोठ्या थकबाकीदारांच्या थकबाकीमुळे सर्वसान्य ग्रामस्थांना देखील आता पाणी वेळेवर उपलब्ध होत नाही. त्यामुळे आता गल्लोगल्ली राजकरणी आणि समाजकारणी मंडळींचा ढीग लागलेला असताना, आता या प्रकरणात आता लक्ष कोण घालणार असा सवाल सर्वसामान्य ग्रामस्थांमधून उपस्थित होत आहे.

      गावातील अनेक मोठे थकबाकीदार ग्रामपंचायत ची बाकी भरण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत मात्र त्यामुळे सर्वसामान्य ग्रामस्थांचे नळ कनेक्शन कट होत आहेत ही बाब अन्यायकारक आहे असे मतं सर्वसामान्य ग्रामस्थांमधून उपस्थित होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या