अहमदनगर/ जावेद शेख : जनतेच्या मुलभूत गरजांना लक्षात घेऊन वाढदिवसाच्या निमित्ताने सामाजाभिमुख उपक्रम राबवून जनतेला अधिकाधिक कसा फायदा होऊ शकेल याकडे लक्ष केंद्रित केल्यास नक्कीच जनसामान्यांना मोठा फायदा होतो, असाच विचार डोळ्यासमोर ठेवत मानवहीत लोकशाही पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सचिनभाऊ साठे यांच्या वाढदिवसानिमित्त ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन आणि मानवहित लोकशाही पक्ष यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत ई -श्रम कार्ड योजना व आधार कार्ड नोंदणी कॅम्प खरवंडीत घेण्यात आला. याचा अनेक ग्रामस्थांनी लाभ घेतला.
यावेळी खरवंडीचे सरपंच प्रदीप पाटील, उपसरपंच रावसाहेब पवळे यांच्या हस्ते कॅम्पची सुरवात करण्यात आली. यावेळी ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे अहमदनगर जिल्हा सरचिटणीस इब्राहीम बागवान, पत्रकार महादेव बटुळे, ग्रामपंचायत सदस्य दौलत सोनवणे, युसूफभाई बागवान, सचिन ढोले, सलीम बागवान, माजी ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र पवळे, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष शब्बीर बागवान, करीम बागवान, परवेज पठाण, वसीम बागवान, शाहरुख सय्यद, करीम तांबोळी, गोविंद पवळे, सोना पवळे, अरुण पवळे, दिगंबर अंदुरे, हरिभाऊ राठोड, परसराम पवळे, विठ्ठल ढाकणे तथा ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अशा या स्तूतीजन्य उपक्रमाची जिल्हाभर जोरदार चर्चा होत असुन इतर सामाजिक संघटना आणि राजकीय पक्ष, पार्टीच्या वतीने देखील असेच जनसामान्यांच्या समस्यांप्रश्नी लोकाभिमुख तथा स्तूतीजन्य उपक्रम राबविण्यात यावेत असेही बोलले जात आहे.
0 टिप्पण्या