पुणे : प्रकल्पग्रस्त शेतकर्यांना एम.आय.डी.सी. मध्ये हक्काचे कामे द्यावे, अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे छावा युवा माथाडी सुरक्षा रक्षक ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब महादेव पाटील यांच्यासह प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, अनेक वेळा शासकीय दरबारी व कंपनी व्यवस्थापनाकडे पत्रव्यवहार करून ही सदर पत्राची कोणतीही दखल न घेतल्या कारणास्तव आम्ही आमचा हक्क मिळवण्यासाठी रास्तारोको आंदोलन करणार आहे. आम्ही रांजणगाव गणपती येथील रहिवासी असुन कुटूंबाची ७० एकर शेत जमीन ही एम.आय.डी.सी. ने आमच्या मर्जी विरूद्ध संपादित केलेली आहे. त्याचा मोबदला आम्हाला आमच्या मनासारखा मिळालेला नाही. या संपादित केलेल्या जमिनीवर इंडोस्पेस ही नामांकित कंपनी कार्यरत आहे. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना संपादित केलेल्या जागेमधील कंपन्यांमध्ये चालणाऱ्या कामात प्रथम प्राधान्य द्यावे असे एम.आय.डी.सी. ॲग्रीमेंट तसेच शासकीय जी.आर. मध्ये नमुद केलेले आहे.
त्या अनुशंगाने प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी प्रांत अधिकारी एम.आय.डी.सी. व कंपनी व्यवस्थापनाकडे कामे मिळण्यासाठी मागील २ वर्षापासुन पाठपुरावा केला आहे. कंपनी व्यवस्थापन प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना साधी नोकरी देण्यास ही नाकारत आहेत. प्रांत अधिकारी यांचे कामे मिळण्याचे शिफारस पत्र कंपनी व्यवस्थापनाला देऊन कंपनी व्यवस्थापन त्याची दखल घेत नसल्याने सरकारच्या व कंपनी व्यवस्थापन ( इंडोस्पेस कंपनी, आर. व्ही. के. ॲन्ड के. व्ही. आर. ग्रुप ) यांच्या विरोधात नाईलाजास्तव रस्त्यावर उतरून रास्तारोको आंदोलन करणार असल्याचा इशारा छावा युवा माथाडी व सुरक्षा रक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब महादेव पाटील, राजेंद्र फक्कड शेळके, सुनिल किसन शेळके, देविदास सुभाष शेळके, नारायण नामदेव शेळके, सतिष फक्कड शेळके, विजय किसन शेळके, सचिन पांडुरंग शेळके आदींनी दिला आहे.
0 टिप्पण्या