अहमदनगर/ जावेद शेख : शहरातील श्री संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या मंदिराच्या सुशोभीकरणासाठी खास बाब म्हणून निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी सुवर्णकार समाजाचे अध्यक्ष स्वामीराज कुलथे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे ग्राम विकास मंत्री यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
श्रीरामपूर शहरात संत शिरोमणी श्री नरहरी महाराज यांचे नगरपरिषद उद्यान जवळ भव्य असे मंदिर आहे. या मंदिराचे सुशोभीकरण निधीअभावी अनेक दिवसांपासून रखडलेले आहे. त्यामुळे या कामाला चालना देण्याच्या हेतूने अध्यक्ष कुलथे यांनी निधीची मागणी मंत्री ना. हसन मुश्रीफ यांना समक्ष भेटून निवेदनाद्वारे केली आहे.
कुलथे हे सुवर्णकार समाजाचे तरुण अध्यक्ष असून समाजाच्या विकासाची त्यांना तळमळ आहे. त्यामुळे ते विकासासाठी ते झटत असून त्यांच्या कार्यशैलीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
0 टिप्पण्या