जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने महिला दिनी, अप्पर पोलिस अधिक्षक स्वातीताई भोर यांचा सन्मान

अहमदनगर/ जावेद शेख : आंतरराष्ट्रीय महिला दिन संपूर्ण जगभरात साजरा झाला. या दिनाचे महत्त्व आहे की महिलेवर विविध देशात अनेक बंधने लादून देखील त्यांनी विविध क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने कर्तृत्व गाजवले आहे व आजही महिला जीवनाच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य आणि नेतृत्व करीत कार्य करून घेत आहेत. मात्र हे सर्व काही करत असताना, त्यांनी बाहेरचे नेतृत्व सांभाळताना घरची सर्व जबाबदारी देखील सांभाळलेली आहे, म्हणून त्या अबला असुनही सबला ठरत आहेत. त्यांच्यात शक्तीधन व विद्येचा सुंदर मिलाप झालेला पाहावयास मिळत आहे, म्हणून कार्य व कर्तुत्वात त्या पुरुषाच्या बरोबरीने किंबहुना काकणभर सरस ठरवून कार्य करीत आहेत.

त्याच प्रकारे आपल्या श्रीरामपूर तालुक्याच्या धडाडीच्या पोलीस अधिकारी अप्पर पोलीस अधिक्षीका स्वातीताई भोर या देखील असल्याने त्यांचा व कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांचा श्रीरामपूर जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या तालुकाध्यक्षा सौ. जयाताई जगताप, सचिव पौर्णिमा पिसे, सुनिताताई दाभाडे, लताताई गुडदे, कलावती देशमुख, अँड. प्रभा दळे, राखी तुपे इत्यादी महिला भगिनी कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या