राहुरी / बाळकृष्ण भोसले - प्रशासनाच्या समनव्यामुळे शासनाच्या विविध योजना तालुक्यातील तळागाळातील सर्वसामान्य व गोर गरीब जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम कर्मचारी करीत असतात कोरोना महामारीमुळे शासन प्रत्येकाला घरीच थांबा असे एकीकडे सांगत असले तरी शासनाचे शिक्षक, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, परिचारिका, डॉक्टर मात्र जनतेमध्ये जाऊन त्यांची सेवा करत होते त्यांचा यथायोग्य सन्मान होवून प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात प्रथमच कर्मचाऱ्यांचा प्रातिनिधिक स्वरूपात गुण गौरव कार्यकम आयोजित केला.
महात्मा फुले विद्यापीठाच्या डॉ. आण्णासाहेब शिंदे सभागृहात दिमाखदार सोहळ्यात गुणवंत कर्मचारी पुरस्कार वितरण कार्यक्रमात गुणवंत शिक्षक पुरस्कार तालुक्यातील चिंचोली येथील आदर्श असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भटारकरवस्ती शाळेतील उपाध्यापिका श्रीम. मिनाक्षी श्रावण पाळंदे यांना राहुरी नगरपरिषदेच्या मा. नगराध्यक्षा सौ.उषाताई तनपुरे यांच्या हस्ते पुरस्कार देवून गौरविण्यात आले.
यावेळी जि.प.सदस्य धनराज गाडे, जनाबाई पैसे, पंचायत समितीच्या सभापती सौ. बेबीताई सोडनर, उपसभापती प्रदीप पवार, माजी सभापती सौ. मनिषाताई ओहोळ, गटविकास अधिकारी गोविंद खामकर, गटशिक्षणाधिकारी अर्जुन गारुडकर, भटारकरवस्ती शाळेच्या केंद्रप्रमुख श्रीम.ठोंबरे उपस्थित होते. श्रीमती पाळंदे यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल चिंचोली व परिसरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
0 टिप्पण्या