श्रीगोंदा/ सुभाष दरेकर : तालुक्यातील हिरडगाव मंगळवार दि. २९ मार्च २०२२ रोजी सकाळी अकराच्या दरम्यान घडलेली घटना...
श्री. हौवसराव भानुदास भुजबळ रा हिरडगाव यांचा मुलगा कु. अनिकेत वय १७ हा बारावीचे क्लास करीता श्रीगोंदा येथे जातो. क्लास संपवून घराकडे परतत असताना मिशन कंपाऊंड जवळ थांबला होता. एस.टी. बंद असलेने रोडवरील येणारे वहानांना हात करून घरी यायचे हे रोज सुरू होते. अशीच एक शिप्ट चार चाकी आली आणि थांबली, त्यात दोन तरुण होते. अनिकेतला कुठे जायचे विचारले? त्याने हिरडगाव सांगितले आणि ते बस म्हणाले. तो मागचे सिटवर बसला. गाडी सुरू झाली ती बारा नंबर चारीवर बाभळीच्या झाडाखाली थांबली. पुढे बसलेला एकजन खाली उतरून लघवी करीता बाजूला गेला. परत येताना त्याचे हातात रूमाल होता. तो गाडीत मागील सिटवर अनिकेत शेजारी बसला. गाडी सुरू झाली मागील व्यक्तीने अनिकेतच्या तोंडावर रुमाल झटकला आणि अनिकेत बेशुद्ध झाला.
पुढे गाडी खेडजवळ गेली. रेल्वे नाक्याच्या अलिकडे एका ऊसाच्या शेताजवळ त्याचे दप्तर झाडाला अडकवले आणि अनिकेतला त्या झाडाखाली टाकले. काही वेळाने अनिकेत शुध्दीवर आला जवळच एक ईले.मोटार चालू असल्याचे दिसले. तिथे त्याने तोंड हातपाय धुतले! तो दिशाभूल झाला. जवळ ऊसतोड सुरू होती! तिथे एक आजी बसलेली होती त्याने घडलेला प्रकार सांगितला. आजीने एका व्यक्तीला बोलावून, अनिकेतला खेडमध्ये सोडले. घरी फोन करून सांगितलेवर नातेवाईक, मित्रमंडळी सतर्क झाली आणि अनिकेतला ताब्यात घेतले. काय प्रकार असेल? गरीब कुटुंबातील मुलगा कशासाठी पळवला ? खंडणी? नरबळी? का किडण्या काढून विक्री? हा तपास होणे आवश्यक आहे. ज्याअर्थी त्यांच्याकडे गुंगीचे औषध होते त्या अर्थी ते हेच उद्योग करत असणार... सावध रहा विशेषतः मुलांनी अनोळखी व्यक्तींच्या गाडीत बसू नका. पालकांनी मुलांना तशी सक्त ताकीद द्यावी. अनिकेतचे नशिब बलवत्तर होते म्हणून त्यांना काही तरी अडचणी आल्या आणि त्याला नाविलाजाने सोडून द्यावे लागले.
0 टिप्पण्या