राहुरी विद्यापीठ/ जावेद शेख : तालुक्यातील मुळाधरणावरील व्हि.आय.पी गेस्ट हाऊस मोरा-या समोरील संरक्षण भिती वरील मोठमोठे लोंखडी पँनल बोडं गेल्या दोन ते तीन महिन्यापासून अचानक गायब झाले आहे.
गेल्या काही दिवसांपुर्वी मुळाधरणावरील मुळाधरण परिसरात जुनी ज्ञानेश्वरी बोट मुळाधरणातील उपअभियंता आंधळे यांनी भंगारात परस्पर विलेवाहट लावण्यात आली व नंतर जिल्हा परिषद सदस्य यांनी बोटी संदर्भात लेखी तक्रार केल्या नंतर काही दिवसांनी चौकशी समिती नेमण्यात आली. चौकशी समिती उद्या येणार आहे, असे समजताच राञीच्या वेळी ग्राईंडर च्या सााह्याने चार ते पाच लोखंडी पॅनल बॉक्स मुळाधरणाच्या विरूद्ध बाजुला राञी मंजुराच्या साह्याने टाकुन दिले व चौकशी समितीला बोट पाण्यात बुडाली असे सांगितले. समितीची दिशाभुल करून व अधिका-यांना वांबोरी फाटा येथील एका हाँटेल मध्ये पार्टी देवुन खुश करण्यात आले व चौकशी समिती चा आवाहल गुंडाळण्यात आल्याची चर्चा आहे.
तरी वरीष्ठ अधिका-यांनी लक्ष घालून योग्य तपासणी करून दोषीवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे. अन्यथा वरीष्ठाना भेटुन कळविणार आहे.
0 टिप्पण्या