श्रीकांत तरमळे यांची राष्ट्रवादीच्या जिल्हा चिटणीस पदी निवड

जिल्हाध्यक्ष कैलास पाटील यांच्या हस्ते नियुक्ती पत्र स्विकारताना श्रीकांत तरमळे सह आदी पदाधिकारी.

विलास लाटे/पैठण : तालुक्यातील श्रीकांत तरमळे यांची नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हा चिटणीस पदी निवड करण्यात आली. या निवडीचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील यांच्या हस्ते नियुक्तीचे पत्र देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी माजी केंद्र मंत्री जयसिंग गायकवाड, जिल्हा युवा अधिकारी संतोष माने, तालुकाध्यक्ष आप्पासाहेब निर्मळ, पक्षनिरीक्षक एकनाथ गवळी, बद्री बोंबले, शुभम छडीदार आदींची उपस्थिती होती.

पक्षावर असलेली निष्ठा व कार्य करण्याची क्षमता बघून पक्ष बळकटीसाठी व पक्षाची ध्येयधोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आपली निवड करण्यात येत असल्याचे निवडीच्या पत्रात म्हटले आहे. या निवडीचे राष्ट्रवादी विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष विशाल वाघचौरे, ज्ञानेश्वर कागदे, विनोद तोष्णीवाल, राजु चव्हाण, सलीम शेख, टिलु चव्हाण, बंडु कागदे, परमेश्वर मोगल, संतोष राठोड, विजय राठोडसह आदीं पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्वागत केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या