वांबोरी येथे सावित्रीमाईंना स्मृतिदिनानिमित्त संत सावता माळी युवक संघातर्फे अभिवादन

अहमदनगर/ जावेद शेख : क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त वांबोरी येथे श्री संत सावता माळी युवक संघाच्या वतीने पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी श्री संत सावता माळी युवक संघाचे मीडिया प्रमुख दिपकराव साखरे, अहमदनगर जिल्हाध्यक्ष अशोकराव तुपे, सोमनाथ कुऱ्हे, पप्पू विधाते, विजय शिंदे, आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना श्री. तुपे म्हणाले क्रांतीज्योती सावित्रीमाई या भारतीय समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ आणि कवयित्री होत्या. त्यांना भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून ओळखले जाते. त्यांचे पती ज्योतिराव फुले यांच्यासोबत त्यांनी भारतातील महिलांचे अधिकार सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांना भारतीय स्त्रीवादाची जननी मानले जाते. सावित्रीमाई आणि त्यांचे पती यांनी १८४८ मध्ये पुणे येथील भिडे वाड्यात मुलींच्या शाळेची स्थापना केली. ही शाळा देशात स्थापन झालेल्या सुरूवातीच्या शाळांपैकी एक होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या