वंचित बहुजन आघाडीच्या महिला अध्यक्ष पदी वंदनाताई भारती यांची निवड

आरडगांव (वार्ताहर) : राहुरी तालुक्यातील आरडगांव येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ. वंदनाताई अनिल भारती यांची वंचित बहुजन आघाडीच्या राहुरी तालुका महिला आघाडीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडी अहमदनगर जिल्हा महासचिव अनिल जाधव यांनी नियुक्ती केली आहे. सौ. वंदनाताई भारती यांना अहमदनगर जिल्हा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सौ.वर्षाताई बाचकर यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले.

यावेळी राहुरी तालुका अध्यक्ष संतोष चोळके, देवळाली शहराध्यक्ष साईनाथ बर्डे, उपाध्यक्ष संदीप कदम, महादेव जैतोबा, वंचित आघाडीचे बापूसाहेब धसाळ, अशोक काळे, केशव म्हसे, बाबासाहेब धसाळ, नितीन काळे, नानासाहेब जाधव, गोरख थोरात, रवींद्र गायकवाड, रवींद्र गोसावी, साहिल पठाण, रवींद्र कांबळे, अंबादास जगधने, जालिंदर जाधव, सुनील जाधव, बाळासाहेब निकम, सागर देशमुख, सचिन भारती, कृष्णा भारती, पूजा भारती, दत्तात्रय जाधव, हरिभाऊ पवार, बाबासाहेब जाधव, वसंत देशमुख आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या